मालिकेत फार गंभीर, सुसंस्कारी असलेली तेजश्री खऱ्या आयुष्यात मात्र खूप खट्याळ आणि मस्तीखोर आहे. नुकताच झी मराठीचा मकर संक्रांती विशेष भाग शूट झाला. या शूटींगमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तेजश्री प्रधान झी मराठीच्या एका फेमस खलनायिकेची मिमिक्री करताना दिसतेय.
( अनेक दिवस हाताला पट्टा लावून फिरतेय, अभिनेत्री वल्लरी विराजला नेमकं झालंय काय? )
advertisement
तेजश्रीनं दुसऱ्या कोणाची नाही तर थेट 'कमळी' मालिकेतील अनिकाची मिमिक्री केली आहे आणि ती तिच्या समोर उभी राहून. दोघांची धम्माल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनिकाने म्हणजेच अभिनेत्री केतकी कुलकर्णी हिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. "लव्ह यू तेजश्री ताई" असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये तेजश्री केतकीला सांगते, "तू हात घालून खाल्लस तरी आम्हाला चालेल." त्यावर केतकी अनिकाच्या स्टाइलमध्ये म्हणाली, "मी नेल्स केलेत ना आता म्हणून मी हाताने नाही खाऊ शकत." त्यावर सगळ्यांचा ओss म्हणत एकत हशा पिकला. तेजश्री अनिकाच्या स्टाइलमध्ये तिची मिमिक्री करत म्हणाली, "मी तुला भरवू का मग एखादा घास." त्यावर अनिकाने 'डाएट' आहे असं सांगितलं. तेजश्रीच्या मिमिक्रीवर मागून अभिनेत्री अभिनेत्री हर्षदा खानविलकर देखील म्हणाली, "वा वा हे आवडलं मला."
पुढे तेजश्रीनं पुन्हा अनिकाची मिमिक्री केली. ती म्हणाली, "मी नाही नेल्स केलेत त्यामुळे मी तुला भरवू शकते." त्यावर अनिका म्हणते, "मी डाएट करतेय." तेजश्री म्हणते, "ठीक आहे एका मोमोने फार फरक पडत नाही." अनिका म्हणते, "नाही हे माझं न्यू इअर रिझोल्युशन आहे. मी नाही खाणार."
तेजश्री आणि केतकी म्हणजेच अनिकाच्या या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नायिका आणि खलनायिका यांच्यातील ही जुगलबंदी प्रेक्षकांना आवडली आहे.
