पुण्यातील पेन प्रदर्शनात 75 हून अधिक पेन उत्पादन कंपन्या सहभागी झाल्या आहेत. अगदी 300 रुपयांपासून खास पेन येथे उपलब्ध आहेत. आज सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पेनचं प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे. या प्रदर्शनात जुने ऐतिहासिक पेन तसेच काही महागडे पेन देखील आहेत. याबाबत श्रीपाल यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.
advertisement
HSC Exam 2026: बारावीच्या परीक्षेबाबत महत्त्वाचं अपडेट, ‘या’ तारखेपासून मिळणार हॉलतिकीट
श्रीपाल यांनी सांगितलं की त्यांच्यापाशी जगातील आठ प्राचीन पेन आहेत. याच्या किमती दोन लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत आहेत. त्यांच्याकडे इटलीतील प्रसिद्ध अरोरा कंपनीची पेन आहेत. या पेनांमध्ये तीन रंगांची पेन असून ती पूर्णपणे चांदीपासून बनवलेली आहेत. या पेनांचे आवरण लॅकरिंग (Lacquering) पद्धतीने तयार करण्यात आले असून त्यावर सात थर आहेत. तसेच त्यांच्याकडे अमेरिका, जपान आणि इटलीतील विविध नामांकित कंपन्यांची पेनही आहेत.
या पेनांची लाखांमध्ये किंमत का असते?
महाग पेनमध्ये साध्या पेनपेक्षा वेगळे आणि दुर्मिळ साहित्य वापरले जाते. या पेनांच्या आवरणासाठी सोनं, चांदी, प्लॅटिनम, खास राळ तसेच नैसर्गिक लॅकरचा वापर केला जातो. अनेक महाग पेनांवर लॅकरिंग पद्धतीने 8 ते 20 थर दिले जातात आणि हे सर्व काम हाताने केले जाते. या पेनांची डिझाईन हस्तकलेतून साकारलेली असते आणि काही पेन तयार होण्यासाठी अनेक महिने लागतात. तसेच या पेनांचा निब बहुतेक वेळा सोन्याचा असतो. हे पेन नामांकित ब्रँड्सची आणि जुनी असल्यामुळे त्यांची किंमत वाढते. असं श्रीपाल यांनी सांगितलं.
दरम्यान, प्रदर्शनात असे अनेक प्रकारचे पेन आणि लेखन साहित्य पाहायला मिळणार आहे. रविवारी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य पाहण्याची संधी पुणेकरांना आहे.





