अजित कुमारच्या या कार अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, त्याची वेगवान कार ट्रॅकजवळील सिक्योरिटी बॅरियरवर आदळते आणि 7 वेळा फिरू लागते. यानंतर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले. सुदैवाने या अपघातात अजितला दुखापत झाली नाही, पण व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांची चिंता वाढू लागली आहे.
मॅनेजरने अजित कुमारच्या तब्येतीची माहिती दिली
advertisement
चाहत्यांची चिंता पाहून अजित कुमारचे मॅनेजर सुरेश चंद्रा यांनी त्याचे हेल्थ अपडेट जारी केले. ते म्हणाले, अजितला दुखापत झालेली नाही, तो निरोगी आहे. "जेव्हा ही घटना घडली तेव्हा तो 180 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत होता." अजितला लहानपणापासूनच मोटर रेसिंगची आवड आहे. 2000 च्या दशकात त्याने रेसिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला होता.
आता, एका दशकाहून अधिक काळानंतर, अजित कुमार त्याच्या नवीन टीम 'अजित कुमार रेसिंग'सह ट्रॅकवर परतला आहे. अजित हा रेसिंग संघाचा मालक आहे आणि तो त्याचे सहकारी मॅथ्यू डेट्री, फॅबियन डफीक्स आणि कॅमेरॉन मॅक्लिओड यांच्यासह शर्यतीत सहभागी होणार होता. फॅबियन ड्युफिक्स गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संघ व्यवस्थापक बनला होता.
