'कप्स कॅफे'वरील हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कपिल शर्माचं हे कॅफे कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील सर्रे येथे आहे. 'कप्स कॅफे' असं नाव असलेल्या या कॅफेच्या माध्यमातून कपिलने रेस्टॉरंट उद्योगात पदार्पण केलं होतं. त्याची पत्नी गिन्नी चतरथ त्याची पार्टनर आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कॅफेबाहेर उभ्या असलेल्या एका कारमध्ये बसलेला व्यक्ती गाडीतूनच सतत गोळीबार करताना दिसत आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
advertisement
खालिस्तानी दहशतवाद्याने हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा!
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येत आहे की, खालिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लाडी याने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र, या दाव्यांची अद्याप पुष्टी झालेली नाही. हरजीत सिंह हा नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी (NIA) च्या यादीतील भारतातील 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्यांपैकी एक आहे.
कपिल शर्माने नुकतंच रेस्टॉरंट सुरू केला आहे आणि अवघ्या तीन दिवसांतच त्याच्या कॅफेवर असा हल्ला झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कॅनडामध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे आणि खासकरून भारतीयांना लक्ष्य केल्या जाण्याच्या घटनांमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेमागे नेमकं कोण आहे आणि त्याचे उद्दिष्ट काय होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. कपिल शर्माने या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याच्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीला या घटनेमुळे धक्का बसला आहे.