TRENDING:

'हिने सुद्धा मला मारलं होतं पण त्यांना...' बिग बॉसची भडास The 50 मध्ये, निक्की-आर्यामध्ये जोरदार खडाजंगी, VIDEO

Last Updated:

Nikki Tamboli - Aarya Jadhao The 50 : रॅपर आर्या आणि निक्की तांबोळी यांनी बिग बॉसच्या घरातील दुश्मनी द 50मध्ये काढली. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये टास्क दरम्यान निक्की आणि आर्या यांच्यात चांगलंच भांडण झाल्याचं पाहायला मिळालं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
'द 50' हा शो नुकताच सुरू झाला आहे. या शोमध्ये बिग बॉस मराठीचेही काही स्पर्धक पाहायला मिळत आहेत. शिव ठाकरे, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव या स्पर्धकांनी द 50 या शोमध्ये सहभाग घेतला आहे. द 50 च्या निमित्तानं बिग बॉस मराठी 5 मध्ये ज्यांची जोरदार भांडणं झाली होती ती निक्की तांबोळी आणि आर्या जाधव देखील आमने सामने आल्या आहेत. द 50मध्ये येताच निक्की आणि आर्या यांनी बिग बॉसमधील भडास बाहेर काढली आहे. निक्कीने आर्यावर नको ते आरोप लावले आहेत.
News18
News18
advertisement

रॅपर आर्या आणि निक्की तांबोळी यांनी बिग बॉसच्या घरातील दुश्मनी द 50मध्ये काढली. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये टास्क दरम्यान निक्की आणि आर्या यांच्यात चांगलंच भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये निक्की आणि आर्या भांडत आहेत. आर्या रागात म्हणते, "मला कानाखाली मारल्यामुळे मला शोमधून काढून टाकलेलं. पण हिने सुद्धा मला मारलेलं पण तिला काढलं नाही."

advertisement

( खरंच सागर कारंडे Bigg Boss Marathi 6 च्या घरात मळत होता तंबाखू? अखेर टीम कडून खरंखोटं समोर )

यावर निक्की म्हणते, "हो मला नाही काढलं जा काय करायचं ते कर." यावर आर्या आणखी भडकते आणि म्हणते, "तुला ते का काढतील... कारण त्यांना काहीतरी प्लास्टिक हवं आहे ना." त्यानंतर निक्की नाचत नाचत आर्याजवळ येते आणि म्हणते, "मग काय झालं, काय झालं". नंतर आर्या सांगते, "हिने बाहेर आल्यानंतर माझं बॉडी शेमिंग केलं. मला बाहेर येऊन ही मोठा हत्ती म्हणाली होती."

advertisement

आर्या आणि निक्कीचं भांडण एवढ्यावरच थांबत नाही. निक्की तिला अरबाजवरूनही चार गोष्टी सुनावते आणि नको ते आरोप करते. निक्की आर्याला म्हणाली, "तू माझ्या बॉयफ्रेंडला छोटे छोटे कपडे घालून टच केलेलं त्याचं काय. बिग बॉसमध्ये सगळ्यांनी पाहिलं होतं की तू त्याला कशी चिपकायला यायचीस." त्यानंतर आर्या निक्कीला काहीतरी अपशब्द बोलते. ते व्हिडीओमध्ये म्युट करण्यात आला आहे. आर्याच्या अपशब्दावर अरबाज देखील संतापतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांपासून काम, तरुणांना रंगमंचाशी जोडतायत गिरीश, अनोखा उपक्रम काय? Video
सर्व पहा

निक्की आणि आर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यात आर्याची बाजू घेतली आहे तर काहींनी निक्कीचं समर्थन केलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'हिने सुद्धा मला मारलं होतं पण त्यांना...' बिग बॉसची भडास The 50 मध्ये, निक्की-आर्यामध्ये जोरदार खडाजंगी, VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल