TRENDING:

Jui Gadkari: एका मतासाठी काहीही... VOTE करायला मतदान केंद्रावर अशी पोहोचली जुई गडकरी

Last Updated:

Jui Gadkari: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वजण आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. सकाळपासून बऱ्याच कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वजण आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. सकाळपासून बऱ्याच कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला पाहायला मिळत आहे. वोट केल्याचा फोटोही कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच मराठी अभिनेत्री जुई गडकरीने एक मत करण्यासाठी ती मतदान केंद्रावर कशी पोहोचली याविषयी पोस्ट शेअर केली. ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
 VOTE करायला मतदान केंद्रावर अशी पोहोचली जुई गडकरी
VOTE करायला मतदान केंद्रावर अशी पोहोचली जुई गडकरी
advertisement

जुई गडकरीने तिचा मतदानाचा हक्क बजावला. वोट करण्यासाठी ती मतदान केंद्रावर कशी पोहोचली याविषयी तिने सांगितले. एक मतही खूप महत्त्वाचे आहे असाही सल्ला तिने यावेळी दिला.

VOTE करायला गेलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं? कधी होती टॉपची एक्ट्रेस, हिरोच्या चक्करमध्ये बर्बाद झालं करिअर

जुईने वोट केल्याचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये वोट करण्यासाठी केलेला प्रवास सांगितला. जुई मुंबईतून कर्जतला गेली. नंतर कर्जत ते मढ आयलंडला सेटवर पोहोचली. यासाठी तिने पहिल्यांदा ट्रेन पकडली मग ती मेट्रोने गेली आणि नंतर ऑटो पकडली. त्यानंतर जेटीने प्रवास करत पुन्हा रिक्षा घेऊन ती सेटवर पोहोचली. 'हे सगळं फक्त एका मतासाठी. एका मताने फरक पडतो. जा आणि मतदान करा' असं जुईने म्हटलं.

advertisement

दरम्यान, जुईने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच व्हायरल झाली. तिच्या या पोस्टवर भरपूर कमेंट येत आहेत. अनेकांनी जुईचे कौतुक केले. काम आणि वैयक्तिक आयुष्य चांगले मॅनेज करते असेही म्हटले, एक मत कर्जतच्या भविष्यासाठी, आदर्श नागरिक, अशा अनेक कमेंट करत लोकांनी जुईवर कौतुकांचा वर्षाव केला.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Jui Gadkari: एका मतासाठी काहीही... VOTE करायला मतदान केंद्रावर अशी पोहोचली जुई गडकरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल