सन ऑफ सरदार 2 : अजय देवगणसह अनेक कलाकार असलेला 'सन ऑफ सरदार 2'ला पाकिस्तानमध्ये प्रचंड पसंती मिळत आहे. या चित्रपटाला या यादीत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.
सैयारा : अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा' या चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही आपली जादू दाखवली आहे. 'सैयारा'ला चांगला प्रतिसाद मिळाला असून, या यादीत त्याला दुसरं स्थान मिळालं आहे.
advertisement
धडक 2 : सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती यांचा 'धडक 2' पाकिस्तानमधील प्रेक्षक आवडीने पाहत आहेत. 'धडक 2' ने या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.
तेहरान : बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमचा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'तेहरान' पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. 'तेहरान' या यादीत दहाव्या स्थानावर आहे.
इंस्पेक्टर जेंडे : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयीचा 'इन्स्पेक्टर जेंडे'ला पाकिस्तानमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला यादीत नववं स्थान मिळालं आहे.
परदेशी चित्रपटांनाही मिळतेय पसंती
टॉप 10 यादीत चौथ्या क्रमांकावर आहे सायन्स फिक्शन हॉरर फिल्म '28 इयर्स लेटर'. पाचव्या क्रमांकावर दक्षिण कोरियाची अॅक्शन थ्रिलर फिल्म 'मेंटिस' आहे. सहाव्या क्रमांकावर डार्क फँटसी अॅक्शन फिल्म 'सेवेंथ सन' आहे. सातव्या क्रमांकावर अमेरिकन अॅनिमेटेड फिल्म 'के पॉप डेमन हंटर्स' आहे. आणि आठव्या क्रमांकावर अमेरिकेची रोमँटिक कॉमेडी-ड्रामा फिल्म 'मटेरियलिस्ट्स' आहे.