रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या अॅनिमल सिनेमात तृप्तीनं जोया नावाची छोटी भूमिका साकारली आहे. तृप्तीचा स्क्रिन टाइमही फार कमी आहे. पण थोड्या काळासाठी आलेल्या तृप्तीनं मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सिनेमानं रिलीजच्या दहा दिवसात 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तृप्तीनं सिनेमात अभिनेता रणबीर कपूरबरोबर सेक्स सीन्स दिले आहेत. ज्यामुळे तृप्ती चांगलीच चर्चेत आलीये. तिच्या एकीकडे टीका देखील होतेय तर दुसरीकडे तिचं कौतुक देखील केलं जातंय. अॅनिमलमुळे तिची सोशल मीडिया फॉलोविंग वाढली आहे. तिच्याकडे अनेक नवे प्रोजेक्ट येऊ लागलेत. पण या सगळ्यामुळे तिची रात्रीची झोप उडाल्याचं ती म्हणतेय.
advertisement
हेही वाचा - 11 महिन्यात तिसऱ्यांदा तोंड लपवून वैष्णो देवीला पोहोचला शाहरूख; Video व्हायरल
अॅनिमल फेम तृप्तीनं पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, माझा फोन रात्रंदिवस वाजत असतो. माझी रात्रीची झोप उडाली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपलं जर कोणी कौतुक करत असेल तर ते मेसेज वाचण्याची एक्साइटमेंट फार मोठी असते. मी रात्रभर सगळ्या कमेंट्स वाचत असते. सगळं खूप छान सुरू आहे. मला खूप प्रेम मिळतंय आणि हा खूप सुंदर अनुभव आहे.
अॅनिमल सिनेमाआधी तृप्तीनं लैला मजनू, कला आणि बुलबुल सारख्या सिनेमात काम केलं आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसात ती मेरे महबूब मेर सनम आणि विक्की विद्या या सिनेमातही दिसणार आहे.