OTT Release Web Series : भारतीय चित्रपटसृष्टीत दरवर्षी हजारो चित्रपटांची निर्मिती केली जाते, पण काही मोजकेच चित्रपट असे असतात जे केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करतात. कथा जरी साधी असली तरी ती जीवनाशी संबंधित काही महत्त्वाचे संदेश देऊन जाते. अलीकडेच एक असा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता, जो लवकरच ओटीटीवरही येणार आहे. या चित्रपटाची जगभरातील सिनेप्रेमींमध्ये चांगलीच चर्चा आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची चांगलीच माऊथपब्लिसिटी झाली होती. आता हा सर्वाधिक चर्चेत असणारा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉ्र्मवर पाहायला मिळणार आहे. थिएटरमध्ये सर्वाधिक चर्चा झालेला हा मल्याळम चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला सिनेप्रेमींनी चांगलीच पसंती दर्शवली होती. सिनेमाला चांगले रेटिंगदेखील मिळाले होते. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट मात्र मागे राहिला होता. पण आता हा बहुचर्चित चित्रपट ओटीटीवर पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मोहनलाल अभिनीत 'हृदयपूर्वम' (Hridayapoorvam) असं या चित्रपटाचं नाव आहे.
advertisement
'या' ओटीटीवर होणार रिलीज!
सत्यन अंथिकड यांचा 'हृदयपूर्वम' हा चित्रपट 28 ऑगस्ट 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अजून या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर येऊन एक महिना ही झाला नाही, आणि आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अलीकडेच याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील आठवड्यात, म्हणजेच 26 सप्टेंबरपासून, जिओ हॉटस्टारवर प्रेक्षक पाहू शकतात.
Deepika Padukone : बॉलिवूडची टॉपची एक्ट्रेस, 500 कोटींची मालकीण असलेल्या दीपिका पादुकोणचं किती झालंय शिक्षण!
काय आहे कथानक?
हृदयपूर्वम या चित्रपटाचं कथानक एक श्रीमंत उद्योजक संदीप बालकृष्णन यांच्या अवतीभोवती फिरणारं आहे. संदीप बालकृष्णन हे रागीट स्वभावाचे आहेत आणि केरळमधील कोचीमध्ये एक क्लाउड किचन चालवतात. अपार संपत्ती असूनही ते एकटेपणाचं आयुष्य जगतात आणि त्यांनी आपल्या भावना कोणासमोर व्यक्त केलेल्या नाहीत. एकेदिवशी त्यांना हार्ट ट्रान्सप्लांटची गरज भासते आणि त्यांच्यावर एका आर्मी ऑफिसरचे हृदय प्रत्यारोपित केले जाते.
हृदयाला फक्त एक अवयव समजणारा संदीप हार्ट ट्रान्सप्लांट डोनरच्या मुलीच्या साखरपुड्यात सहभागी होतो. मात्र, डोनरच्या मुलीचा साखरपुडा तुटतो आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसतो. या काळात संदीपलाही काही काळ त्या घरात राहणे भाग पडते. त्यानंतर संदीपच्या आयुष्यात जो बदल होतो, तो त्याला जगण्याचा आणि भावनांचा खरा अर्थ शिकवतो. या चित्रपटाला IMDb कडून 7.1 रेटिंग मिळाले आहे.