TRENDING:

Urvashi Rautela : भारत-पाक मॅच पाहायला गेलेल्या उर्वशी रौतेलाला लाखोंचा चुना; अभिनेत्रीसोबत घडलं असं काही

Last Updated:

नुकतीच भारत पाकिस्तान मॅच पाहायला उर्वशी अहमदाबादला पोहोचली होती. तिच्या कातिलाना अंदाजाने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. पण या मॅचला जाणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. काय घडलं नक्की जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 15 ऑक्टोबर :  बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशी आणि क्रिकेटचं नातं जुनं आहे. तिला भारताच्याच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटरच्या नावाने देखील चिडवलं जातं. उर्वशी आणि रिषभ पंत यांच्या नात्याची खूपच चर्चा झाली होती. आता एवढं असल्यावर उर्फी भारत पाकिस्तान मॅच पाहायला जाणार नाही हे शक्य नाही. नुकतीच भारत पाकिस्तान मॅच पाहायला उर्वशी अहमदाबादला पोहोचली होती. तिच्या कातिलाना अंदाजाने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. पण या मॅचला जाणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. काय घडलं नक्की जाणून घ्या.
उर्वशी रौतेला
उर्वशी रौतेला
advertisement

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाची नवीन पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मॅचमध्ये उर्वशीच्या लाखो रुपयांचा आयफोन हरवला आहे. पण हा फोन साधासुधा नसून चक्क 24 कॅरेट सोन्याचा होता. हा फोन कुठेही हरवला नसून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जिथे ती भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेली होती. या पोस्टद्वारे उर्वशीने लोकांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे. उर्वशीची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत असून लोक या पोस्टवर सातत्याने कमेंट करत आहेत.

advertisement

'या' चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येणार बॉबी, सनी आणि धर्मेंद्र? बॉबी देओलने दिली मोठी अपडेट

उर्वशी रौतेलाने ट्विट करून ही माहिती दिली. उर्वशीने पोस्टमध्ये लिहिले- 'माझा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हरवला आहे. कोणाला तो सापडल्यास, कृपया मला मदत करा आणि शक्य तितक्या लवकर माझ्याशी संपर्क साधा. अभिनेत्रीने अनेक टॅग वापरले आणि शेवटी तिने लिहिले - 'कृपया त्यांना टॅग करा जे मदत करू शकतात.'

advertisement

उर्वशीच्या या पोस्टवर अहमदाबाद पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर टिप्पणी करताना, अहमदाबाद पोलिसांनी तिच्या फोनशी संबंधित सर्व तपशील मागवले आहेत जेणेकरून ते फोनची चौकशी सुरू करू शकतील. मात्र, याआधी सामन्यादरम्यान अनेक स्टार्सचे फोन हरवले आहेत. या स्टेडियममध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा फोन हरवला होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेस्टॉरंटसारखी लागेल चवं, घरीच बनवा झणझणीत बांगडा फ्राय, रेसिपीचा Video
सर्व पहा

उर्वशी रौतेलची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूजर्सही या पोस्टवर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. या सामन्यापूर्वी अभिनेत्रीने सामन्यासाठी 5 तिकिटे खरेदी केली होती आणि एक व्हिडिओ शेअर केला होता जो चर्चेत राहिला. तुम्हाला सांगतो, उर्वशी रौतेला तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओंमुळे जास्त चर्चेत असते. चाहते आणि सेलिब्रिटी त्याच्या व्हिडिओंवर सतत कमेंट करत असतात.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Urvashi Rautela : भारत-पाक मॅच पाहायला गेलेल्या उर्वशी रौतेलाला लाखोंचा चुना; अभिनेत्रीसोबत घडलं असं काही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल