Bangda Fry Recipe : रेस्टॉरंटसारखी लागेल चवं, घरीच बनवा झणझणीत बांगडा फ्राय, रेसिपीचा Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या रेसिपीमध्ये काही खास ट्रिक्स वापरण्यात आल्या आहेत, त्यामुळे मासा छान कुरकुरीत होतो आणि चवही अगदी रेस्टॉरंटसारखी लागते.
पुणे : बाहेर मिळणारा कुरकुरीत आणि झणझणीत बांगडा फ्राय आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. मात्र तोच चविष्ट बांगडा फ्राय घरच्या घरी तयार करणार आहोत? आज आपण अगदी मोजक्या साहित्यात, कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने हा बांगडा फ्राय कसा बनवायचा हे पाहणार आहोत. या रेसिपीमध्ये काही खास ट्रिक्स वापरण्यात आल्या आहेत, त्यामुळे मासा छान कुरकुरीत होतो आणि चवही अगदी रेस्टॉरंटसारखी लागते. ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे.
बांगडा फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बांगडा अर्धा किलो, लसूण, हळद, कांदा-लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, रवा, तांदळाचे पीठ, कढीपत्ता, तेल, मीठ हे साहित्य लागेल.
बांगडा फ्राय कृती
कुरकुरीत बांगडा फ्राय बनवण्यासाठी सुरुवातीला बांगडे स्वच्छ धुवून त्यात हलक्या चिरा द्याव्यात. नंतर लसूण ठेचून कांदा-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून हा मसाला बांगड्याच्या चिरांमध्ये भरून संपूर्ण बांगड्याला दोन्ही बाजूने लावा आणि अर्धा तास मुरण्यासाठी ठेवा. या दरम्यान प्लेटमध्ये मोठा रवा, तांदळाचे पीठ, मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला एकत्र करून मिक्स करा.
advertisement
नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यावर तेल पसरवा आणि मुरलेल्या बांगड्याला रव्याच्या मिश्रणात बुडवून मध्यम आचेवर फ्राय करा. फ्राय करताना फक्त एकदाच पलटी करा, ज्यामुळे त्याचे कुरकुरीत आवरण तुटणार नाही. तर अशा पद्धतीने आपला हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत आणि झणझणीत बांगडा फ्राय तयार झाला आहे. तयार बांगडा फ्राय ज्वारी किंवा तांदळाच्या भाकरीसह खायला अप्रतिम लागतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 12:25 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Bangda Fry Recipe : रेस्टॉरंटसारखी लागेल चवं, घरीच बनवा झणझणीत बांगडा फ्राय, रेसिपीचा Video









