धक्कादायक! लग्नाला 5 वर्ष, तरी पतीची वारंवार 'ती' मागणी; त्रासाला कंटाळून पुण्यातील विवाहितेनं आयुष्य संपवलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पीडित महिलेचा विवाह पाच वर्षांपूर्वी सागर शेडगे याच्याशी झाला होता. संसाराचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी क्षुल्लक कारणावरून तिचा छळ सुरू केला
पुणे : पुणे शहरातून सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धनकवडी येथील आंबेगाव पठार भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंदेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.
पोलिसांनी पती सागर चंद्रकांत शेडगे, सासू कमल शेडगे, सासरे चंद्रकांत शेडगे (सर्व रा. स्वामीकृपा बिल्डिंग, आंबेगाव पठार) आणि नणंद सारिका हर्षल वाल्हेकर (वय ३३, रा. कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित महिलेच्या भावाने यासंदर्भात फिर्याद दिली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह पाच वर्षांपूर्वी सागर शेडगे याच्याशी झाला होता. संसाराचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी क्षुल्लक कारणावरून तिचा छळ सुरू केला. "लग्नात मानपान केला नाही" आणि "हुंड्यात हव्या तशा वस्तू मिळाल्या नाहीत" असे टोमणे मारून तिला मानसिक त्रास दिला जात असे. इतकेच नव्हे तर, पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारीरिक आणि मानसिकरीत्या छळले. सासरच्या या सततच्या त्रासामुळे आणि त्रासाची परिसीमा गाठल्यामुळे अखेर या विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
advertisement
भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीच्या अनुषंगाने आरोपींची चौकशी केली जात आहे. पाच वर्षांच्या सुखी संसाराचे स्वप्न अशा प्रकारे सासरच्या छळामुळे भंगल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 12:22 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! लग्नाला 5 वर्ष, तरी पतीची वारंवार 'ती' मागणी; त्रासाला कंटाळून पुण्यातील विवाहितेनं आयुष्य संपवलं







