कोण आहे Bigg Boss Tamil 9 ची विजेती दिव्या गणेश? 8 वर्षांपूर्वी मोडलेला प्रसिद्ध अभिनेत्यासोबतचा साखरपुडा
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Tamil 9 : दिव्या गणेश 'बिग बॉस तमिळ 9'ची विजेती ठरली आहे. दिव्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Bigg Boss Tamil 9 : 'बिग बॉस तमिळ 9'च्या ट्रॉफीवर दिव्या गणेशने आपलं नाव कोरलं आहे. अनेक महिने चाललेल्या नाट्य, रणनीतीपूर्ण खेळ आणि भावनिक चढ-उतारांनंतर 'बिग बॉस तमिळ 9'ने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला. वाइल्ड कार्ड स्पर्धक असलेल्या दिव्याने आपल्या विनोदबुद्धी, आत्मविश्वास आणि दमदार गेमप्लेमुळे प्रेक्षकांची मने जिंकली. 31 वर्षीय दिव्यावर सध्या सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिव्या या पर्वाची विजेती ठरल्याने चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. 'बिग बॉस तमिळ 9'ची विजेती दिव्या गणेश ठरली असली तरी उपविजेता सहरीनाथन ठरला. तर विक्कल्स विक्रम तिसऱ्या आणि अरोरा सिंक्लेयर चौथ्या स्थानावर होते.
कोण आहे दिव्या गणेश?
दिव्या गणेशचा जन्म 12 सप्टेंबर 1994 रोजी झाला. दिव्या 31 वर्षांची आहे. तामिळनाडूमधील रामनाथपूरम याठिकाणी ती लहानाची मोठी झाली आहे. लहानपणापासूनच तिला मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
दिव्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये ‘केलाडी कनमनी’ या तमिळ मालिकेपासून केली. तिने ‘विन्नैथांडी वरुवाया’ आणि ‘लक्ष्मी वंधाचु’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं. यात तिने अभिनेत्री वाणी भोजनसोबत स्क्रीन शेअर केली. 2019 मध्ये ‘भाग्यरेखा’ या मालिकेच्या माध्यमातून तिने तेलुगू टीव्ही विश्वात पदार्पण केले. त्यानंतर ‘सुमंगली’, ‘बाकियालक्ष्मी’ आणि ‘चेल्लम्मा’ अशा अनेक यशस्वी तमिळ मालिकांमध्ये अभिनय करत ती प्रचंड लोकप्रिय झाली.
advertisement
2017 मध्ये मोडलेला साखरपुडा
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या गणेशचा साखरपुडा 2017 मध्ये अभिनेता आणि निर्माता आर. के. सुरेश यांच्यासोबत झाला होता. मात्र त्यांचं नातं तुटलं. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 12:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कोण आहे Bigg Boss Tamil 9 ची विजेती दिव्या गणेश? 8 वर्षांपूर्वी मोडलेला प्रसिद्ध अभिनेत्यासोबतचा साखरपुडा










