नुकत्याच दिलेल्या 'लोकमत फिल्मी' च्या मुलाखतीमध्ये वर्षा करिअरमधील अनेक गोष्टींविषयी बोलल्या. कारकिर्दीचा प्रवास मोकळेपणाने उलगडला. त्या म्हणाल्या, “मराठी चित्रपटात मी जे स्थान मिळवलं, ते सहज नाही मिळालं. ते स्थान मला दिलं लेखक, दिग्दर्शक आणि माझ्या प्रेक्षकांनी.”
5 एकरांवर घर, 500 एकरांचं शेत, अभिनेत्याला सगळंच विकावं लागलं, नेमकं घडलं काय?
advertisement
वर्षा म्हणाल्या, “लोक मला मराठी चित्रपटांची श्रीदेवी किंवा माधुरी दीक्षित म्हणायचे. पण मला ‘मीच’ असण्याची ओळख महत्त्वाची वाटते. मी कोणाचं अनुकरण नाही केलं, मी ‘वर्षा उसगांवकर’ म्हणूनच लोकांच्या मनात राहू इच्छिते.” माझं वेगळं स्थान निर्माण झालं मी याचं श्रेय सतिश कुलकर्णीला देते. त्याने वंडरगर्ल हे नाव मला दिलं. गंमत जंमत सिनेमानंतर मला रोल आहे ते सगळे स्त्रीप्रधान आले.
पुढे वर्षा म्हणाल्या, त्या काळी अशोक-लक्ष्या यांची लाट नक्कीच होती. पण, मी भूमिका निवड करून घेतल्या. ‘पसंत आहे मुलगी’, ‘रेशीमगाठी’, ‘खट्याळ सासू नाटाळ सून’, ‘यज्ञ’, ‘पैंजण’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ हे सगळे चित्रपट अभिनेत्रीकेंद्रित होते. या चित्रपटातील भूमिका साकारताना मला माझं अभिनय कौशल्य दाखवता आलं आणि त्यामुळे माझं वेगळं स्थान निर्माण झालं,” ज्यामुळे माझा अभिनय माझं काम अधिक प्रभावी ठरलं.