TRENDING:

'शोले'मधील जेलरची भूमिका अजरामर करणाऱ्या असरानी यांचे निधन, 84 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

Last Updated:

Govardhan Asrani Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते असरानी यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. आज सोमवार, २० ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या खास विनोदी शैलीने हसवणारे आणि प्रत्येक भूमिकेत जान ओतणारे लोकप्रिय अभिनेते आणि कॉमेडियन असरानी यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. दिवाळीच्या शुभ दिवशीच, म्हणजेच सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी, त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
News18
News18
advertisement

८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

असरानी, ज्यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी असे होते, ते गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच २० ऑक्टोबरच्या दुपारी, सुमारे १ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी यांचे व्यवस्थापक बाबुभाई थीबा यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, असरानी यांची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नव्हती.

advertisement

माहितीनुसार, असरानी गेल्या पाच दिवसांपासून आरोग्य निधी रुग्णालयात दाखल होते. त्यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवत होता, ज्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

सांताक्रुझ स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार

असरानी यांचा अंत्यसंस्कार मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीवर पार पडला. वृत्तसंस्था ANI ने त्यांच्या अंत्यसंस्काराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात त्यांचे कुटुंबीय शेवटच्या विधीसाठी उपस्थित असल्याचे दिसले.

advertisement

५० हून अधिक काळ गाजवली इंडस्ट्री

राजस्थानच्या जयपूर येथे ब्रिटिश सत्ताकाळात त्यांचा जन्म झाला होता. असरानी यांना १९७०च्या दशकात ‘मेरे अपने’ या चित्रपटातून मोठी ओळख मिळाली. असरानी यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. विशेषतः, 'शोले' चित्रपटातील त्यांचे जेलरचे पात्र आजही खूप प्रसिद्ध आहे. "हम अंग्रेजोंके जमानेके जेलर है" हा त्यांचा डायलॉग आजही लोकांच्या ओठांवर आहे.

advertisement

त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केले आणि ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. निधनापूर्वी काही तासांपूर्वीच त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छा पोस्ट केल्या होत्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

दिवाळीच्या उत्साहाच्या वातावरणात त्यांच्या निधनाची बातमी आल्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेमातील विनोदी अभिनयाचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे, असे म्हटले जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'शोले'मधील जेलरची भूमिका अजरामर करणाऱ्या असरानी यांचे निधन, 84 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल