तेलंगणातील जोगुलांबा गडवाल जिल्ह्यात विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात झाला. 6 ऑक्टोबर संध्याकाळी अभिनेता विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात झाल्याची माहिती सोशल मीडियावर समोर आली. त्यानंतर विजयने एक्स अकाउंटवर पोस्ट लिहित नेमकं काय घडलं याची माहिती दिली.
advertisement
विजयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "सगळं ठीक आहे. गाडीचा अपघात झाला, पण आम्ही सगळे ठिक आहोत. त्यानंतर मी स्ट्रेंथ वर्कआउट केलं आणि आत्ताच घरी परतलो. डोकं थोडं दुखतंय, पण बिर्याणी आणि झोप हे सगळं ठीक करेल. तुमच्यापैकी सगळ्यांना बिग हग आणि खूप सारं प्रेम. बातम्या ऐकून ताण घेऊ नका."
विजय देवरकोंडाने एका खाजगी समारंभात रश्मिका मंदान्नासोबत साखरपुडा केल्याची बातमी समोर आल्यानंतर काही तासात विजय देवरकोंडाच्या कारचा अपघात झाला. विजय देवरकोंडाने त्याच्या कुटुंबासह श्री सत्य साई बाबांच्या महासमाधीचे दर्शन घेतले होतं. ज्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. दरम्यान तो एअरपोर्टवर स्पॉट झाला होता तेव्हा त्याच्या हातात एक रिंग दिसली. ही रिंग साखरपुड्याचीच असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.
रश्मिका तिच्या शब्द आणि हावभावांद्वारे विजयसोबतच्या तिच्या नात्याबद्दल संकेत खूप आधीच दिले होते. 'गीता गोविंदम' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर 'डियर कॉम्रेड' या सिनेमात त्यांचं नातं आणखी घट्ट होतं गेलं. विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अद्याप त्यांच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. विजय शेवटचा 'किंगडम' मध्ये दिसला होता. तर रश्मिकाचा 'थामा' हा चित्रपट 21 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.