हा अपघात इतका भयानक होता की, विजयच्या गाडीच्या डाव्या बाजूला मोठा धक्का बसून नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर विजय देवरकोंडाने जराही वेळ न घालवता तातडीने आपल्या एका मित्राला बोलावले. मित्राच्या गाडीतून तो थेट हैदराबादच्या दिशेने रवाना झाला. अपघातानंतर तातडीने दुसऱ्या गाडीतून निघून जाण्यामुळे विजयच्या चाहत्यांमध्ये त्याच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता निर्माण झाली होती.
advertisement
पोलिसांनी दिली अपघाताची माहिती
या अपघाताविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले, "अभिनेता विजय देवरकोंडा आज दुपारी साधारण तीन वाजता पुट्टपर्थी येथून हैदराबादला आपल्या कारने जात होता. त्यावेळी पुढे चाललेल्या एका बोलेरो गाडीने अचानक उजवीकडे वळण घेतले. या बोलेरोचा उजवा भाग विजयच्या कारच्या डाव्या भागाला धडकला."
पोलिसांनी स्पष्ट केले की, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विजयच्या गाडीत त्याच्यासोबत आणखी दोन लोक होते. अपघात होताच, ते सर्वजण तात्काळ दुसऱ्या गाडीत बसून निघून गेले.
विजय देवरकोंडाची टीम इतकी घाईत होती की, त्यांनी अपघाताचा किंवा नुकसानीचा कोणतीही मोठी तक्रार दाखल केली नाही. केवळ गाडीच्या विम्यासाठी त्यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. सध्या विजय देवरकोंडा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि अपघातानंतर त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात मोठा असला तरी, विजयने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.