करूर शहरातील विद्यार्थी संघटना TNSU ने थेट विजयवर आरोप केले आहेत आणि त्याच्या अटकेची मागणी केली आहे. शहरातील भिंतींवर लावलेल्या पोस्टर्समुळे हा वाद आणखी पेटला आहे. पोस्टर्समध्ये विजयचे हात रक्ताने माखलेले दाखवले असून, '39 निष्पाप जीव गेले, आणि विजय पळून गेला. मला खुनी म्हणून अटक करा' असे ठळकपणे लिहिले आहे.
advertisement
'दारुच्या नशेत मला जबरदस्ती KISS करण्याचा...' अभिनेत्रीचे प्रसिद्ध डायरेक्टरवर गंभीर आरोप
या अपघातानंतर विजयवर सातत्याने विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. टीकाकार म्हणतात की अपघातानंतरही विजय लगेच रॅली सोडून चेन्नईला परतला, ज्यामुळे त्यांच्यावर बेजबाबदारीचे आरोप झाले.त्यात भर म्हणजे, काही दिवसांपूर्वी त्यांच्या नीलंकराई घराबाहेर बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली. पोलिस आणि श्वानपथकाने तपास केला, काही संशयास्पद वस्तू सापडली नाही. तरीही सुरक्षा वाढवण्यात आली. या सर्व प्रकारांनी विजयवरचा दबाव वाढला आहे.
दरम्यान, दुसरीकडे, विजयच्या पक्षाने या प्रकरणाला कटकारस्थान म्हटले आहे. टीव्हीकेने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की विजयला मुद्दाम अडचणीत आणले जात आहे.जखमींच्या कुटुंबीयांसाठी विजयने प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पण विरोधकांना हे अपुरं वाटतंय. त्यांचा आरोप आहे की इतक्या मोठ्या दुर्घटनेला फक्त पैशाने झाकता येणार नाही.