दरम्यान ऋषभच्या चित्रपटात वर्णी लागलेला हा अभिनेता म्हणजे, एकेकाळी अभिनेत्री ऐश्वर्या रायचा बॉयफ्रेंड म्हणून चर्चेत असलेला विवेक ओबेरॉय.
विवेक ओबेरॉय साकारणार 'औरंगजेब'
क्रूर मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारण्यासाठी आता विवेक ओबेरॉय सज्ज झाला असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. यापूर्वी अक्षय खन्नानेही लक्ष्मण उतेकरच्या 'छावा' सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारून वाहवा मिळवली होती. आता विवेक ओबेरॉय या भूमिकेला कसा न्याय देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
advertisement
संदीप सिंह यांच्या निर्मितीखालील ऋषभ शेट्टीचा हा ऐतिहासिक चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर आणणार आहे. विवेक ओबेरॉयची औरंगजेबाच्या भूमिकेतील एन्ट्री म्हणजे, मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील थरारक ऐतिहासिक संघर्ष पाहण्याची प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.
जिजाऊंच्या भूमिकेत शेफाली शाह
या चित्रपटात इतर कलाकारांची निवडही तितकीच प्रभावी करण्यात आली आहे. माहितीनुसार, बॉलिवूडमधील सशक्त अभिनेत्री शेफाली शाह या चित्रपटात राजमाता जिजाऊ यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या दोन दिग्गज कलाकारांच्या समावेशामुळे चित्रपटाची स्टार व्हॅल्यू आणि प्रेक्षकांमधील उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
चाहत्यांमध्ये उत्साह, पण अधिकृत घोषणा कधी?
हे वृत्त समोर आल्यानंतर विवेक ओबेरॉयचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर आपला उत्साह व्यक्त केला आहे. विवेक ओबेरॉयने यापूर्वी 'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकमध्ये मोदींची भूमिका साकारली होती, ज्यामध्ये त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती. आता तो पूर्णपणे नकारात्मक आणि ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने, त्याच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
तथापि, या बातमीवर चित्रपट निर्मात्यांकडून अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य आलेले नाही. लवकरच मेकर्स चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टबद्दल आणि विवेकच्या भूमिकेबद्दल खुलासा करतील, अशी अपेक्षा आहे.
