मुळशी पॅटर्न चा पुढचा भाग म्हणजेच पार्ट 2 कधी येणार? याविषयी निर्माता पुनीत बालन आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी मोठी घोषणा केलीय. आज दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मोस्ट अवेटेड मुळशी पॅटर्न 2 ची घोषणा करून टाकली.
'सिंघम' अभिनेत्री, 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम; लाडकी खलनायिका काळ्याच्या पडद्याआड
advertisement
पुढच्या वर्षी बरोबर दहीहंडीच्या वेळी 'मुळशी पॅटर्न 2' रिलीज करू, अशी घोषणा सिने निर्माता पुनीत बालन यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना केली. बरोबर 7 वर्षांपूर्वी मुळशी पॅटर्न हा सिनेमा रिलीज झाला होता. याच सिनेमाच्या माध्यमातून प्रवीण तरडे घराघरात पोहोचले त्यानंतर बरोबर 7 वर्षांनी आज या दोघांनी मुळशी पॅटर्नचा पुढचा भाग म्हणजेच पार्ट 2 येणार असल्याची घोषणा करून टाकली. त्या दोघांशी न्यूज18 लोकमतने ही exclusive बातचीत केली.
दरम्यान, 2018 साली आलेल्या मुळशी पॅटर्न प्रेक्षकांमध्ये खूप चालला. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भाषांमध्ये रिमेकदेखील बनवण्यात आला. त्यामुळे आता मुळशी पॅटर्नच्या येत्या भागात काय खास असेल? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.