तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन आगामी चित्रपट 'पुष्पा द रुल'च्या प्रमोशनसाठी मुंबईत पोहोचला. यावेळी त्याने मुंबईकरांना मराठीतून अभिवादन केले. अल्लू अर्जुनच्या या कृतीचं खूप कौतुक केलं जात असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या इव्हेंटसाठी अल्लू अर्जुनने संपूर्ण काळ्या रंगाचा पेहराव केला होता. त्याने 'पुष्पा २' असं लिहिलेलं काळ्या रंगाचं ब्लेजर घातलं होतं. अल्लू अर्जुन येताच सूत्रसंचालकाने त्याचं स्वागत केलं. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं. यानंतर अल्लू अर्जुनने सर्वांना अभिवादन केलं. तो म्हणाला, “कसं काय मुंबई!” अल्लू अर्जुनला मराठीत बोलताना पाहून सर्वांनाच आनंद झाला.
advertisement
'आई कुठे काय करते' मालिका अखेर Off Air! प्रेक्षकांना निरोप देताना कलाकार भावुक, शेअर केली खास पोस्ट
अल्लू अर्जुनने मराठीत बोलण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधी तीन वर्षांपूर्वी 'पुष्पा'च्या पहिल्या भागावेळी अल्लू अर्जुन मुंबईत आला होता, तेव्हा त्याने सर्वांशी मराठीत संवाद साधत 'नमस्कार' असं मराठीत म्हटलं होतं.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. 'पुष्पा 2'चे आगाऊ बुकिंग देखील सुरू झालं आहे. आगाऊ बुकिंगमधून 'पुष्पा 2'ने कोटींचं कलेक्शन केलं आहे. साऊथ आणि बॉलिवूडचे सिनेमे एकमेकांना क्लॅश होणार होते. मात्र आता 'छावा'ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे.
विकी कौशलचा 'छावा' हा सिनेमा आता 6 डिसेंबरला नाही तर 14 फेब्रुवारी 2025 ला रिलीज होणार आहे. 14 फेब्रुवारीनंतर लगेचच 4 दिवसांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारी ही तारीख 'छावा'च्या रिलीजसाठी योग्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.