चंद्रयान फोर : सॅम्पल रिटर्निंग मिशन
चंद्रयान फोर मोहिमेला ‘सॅम्पल रिटर्निंग मिशन’ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेत एक अंतराळयान चंद्रावर जाऊन मातीचे नमुने गोळा करेल आणि ते पृथ्वीवर घेऊन येईल. या आधी इस्रोने चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं आहे. मात्र आता चंद्रावरून माघारी येणं आणि माती आणणं हे पुढचं पाऊल असेल.
advertisement
डॉकिंग-अनडॉकिंगचा यशस्वी प्रयोग
या मोहिमेचा महत्त्वाचा भाग म्हणजे डॉकिंग व अनडॉकिंग प्रक्रिया. यामध्ये एक अंतराळयान दुसऱ्या यानाला जोडते आणि नंतर वेगळी होते. ही प्रक्रिया इस्रोने पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या पार पाडली आहे. पुढील टप्प्यात याच प्रक्रियेची चंद्राच्या कक्षेत चाचणी होईल. यानंतर अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून मातीचे नमुने गोळा करून परत येईल.
1200 कोटींचा खर्च
चंद्रयान फोरसाठी अंदाजे 1200 कोटींचा बजेट निश्चित करण्यात आला आहे. हा प्रकल्प 2027-28 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. यासाठी तांत्रिक आणि वैज्ञानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे.
मौल्यवान माहिती
अमिताभ कुमार यांच्या मते, चंद्रयान केवळ भारताचा अभिमान नसून, हा विज्ञानासाठी एक मौल्यवान स्रोत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर अवघ्या 10-15 सेमी आत तापमानात मोठी घट होते. हे लक्षात येते की चंद्राच्या आतील भागात बर्फ किंवा तापमान कमी करणारे पदार्थ असू शकतात. त्याचप्रमाणे चंद्राच्या दक्षिणी ध्रुवाजवळ पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. या भागातील माहिती इतर देशांकडील माहितीस पूर्णपणे भिन्न आहे. आणि त्यातून नवे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत आहेत.
चंद्रावर पूर्वी जीवन होतं का?
शास्त्रज्ञच्या मते, कधीतरी चंद्रावरही जीवन असण्याची शक्यता होती. तिथे काय घडलं, जेणेकरून जीवन नष्ट झालं? आणि अशीच कोणती घटना पृथ्वीवर घडू शकते का? जी भविष्यात मानवाच्या अस्तित्वावर संकट निर्माण करेल? हे समजून घेण्यासाठी चंद्राच्या अभ्यासाची नितांत गरज आहे.
गंभीर परिणाम?
संशोधनानुसार, चंद्र हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे. याचा अर्थ पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण कमी होत आहे किंवा चंद्राचे वाढत आहे. हे बदल पृथ्वीवरील भरती-ओहोटीवर परिणाम करू शकतात. ज्या पद्धतीने समुद्रात भरती-ओहोटी होते. त्यात बदल झाल्यास पर्जन्यचक्रात अडथळा, पर्जन्याचा अभाव, दुष्काळ आणि अन्नटंचाई येऊ शकते.
मिशन चंद्रयान
या सर्व वैज्ञानिक बाबी लक्षात घेता. मिशन चंद्रयानसारखे प्रकल्प केवळ राष्ट्राच्या अभिमानासाठी नाहीत. तर मानवतेच्या भविष्याच्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक आहेत. चंद्रावरून माती आणणं, तिथे मानव पाठवणं आणि त्या आधारावर पृथ्वीवरील संभाव्य संकटांपासून मानवजातीला वाचवणं — हीच या मोहिमेमागची खरी प्रेरणा आहे.