आज नवे वर्ष हे १ जानेवारी रोजी साजरे केले जाते. पण सुरुवातीला १ जानेवारी या तारखेला नव वर्ष साजरे केले जात नव्हते.
प्राचीन मेसोपोटामियामधील (आताचा इराक) 2000 ई.पू. नोंदवलेला सर्वात जुना नववर्ष सण अकितु या नावाने ओळखला जातो. हा सण साधारणतः मार्चच्या सुमारास होत असे. हा 12 दिवसांचा उत्सव नवीन राजाचा राज्याभिषेक किंवा विद्यमान शासकाशी निष्ठा पुन्हा दृढ करण्यासाठी साजरा केला जात असे. तसेच अकितु हा सण कापणीच्या हंगामाशी जोडलेला होता. त्यामुळे सणात कृषी महत्त्वही सामील झाले होते.
advertisement
नव वर्षाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर विविध संस्कृतींनी धार्मिक,खगोलशास्त्रीय किंवा कृषी महत्त्वाच्या घटनांशी त्यांचे नववर्ष उत्सव जोडले आहेत. प्राचीन इजिप्त, सिरीयसमध्ये नववर्ष हे सर्वात तेजस्वी ताऱ्याच्या उदयासोबत सुरू होत असे.जे साधारणतः जुलैच्या मध्यात होई.हा कालावधी नाइल नदीच्या वार्षिक पुरासोबत जुळत असे. का काळ कृषीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा होता.इजिप्तमध्ये नवीन वर्षाच्या आधी पाच दिवस साजरे केले जात आणि त्यानंतर त्यांच्या 12 महिन्यांच्या कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याने सुरू होई. यातील प्रत्येक महिना 30 दिवसांचा होता.
चीनमध्ये नववर्षाचा इतिहास 3,500 वर्षांचा दिसून येतो. साधारणतः जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या काळात येते नव वर्ष साजरे केले जात होते.
इस्लामपूर्व अरबमध्ये प्रमाणित कॅलेंडर नव्हते.मात्र दुसऱ्या इस्लामी खलिफा उमर प्रथम यांनी इस्लामी चंद्र कॅलेंडर स्थापन केले. रोममध्ये वर्षाची सुरुवात मार्चपासून सुरुवात होत असे आणि कॅलेंडरमध्ये 10 महिने होते.
आधुनिक कॅलेंडरचा प्रवास
ज्युलियस सीझर यांनी खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ सॉसिजेनेस यांच्या सल्ल्याने 46 ई.पू मध्ये रोमन कॅलेंडरचे सुधारणा करून ज्युलियन कॅलेंडर आणले. यामध्ये जानेवारी 1 पासून वर्षाची अधिकृत सुरुवात केली आणि लीप इयर समाविष्ट केले.मात्र यात प्रत्यक्ष कालावधीपेक्षा 11 मिनिटांचा अधिक वेळ होता. त्यामुळे कालांतराने कॅलेंडरमध्ये विसंगती आली.
15 व्या शतकाच्या मध्यापर्यंत ज्युलियन कॅलेंडर सौर चक्रापासून 10 दिवस मागे होते.ही चूक सुधारण्यासाठी पोप ग्रेगरी 13 व्या यांनी 1570 च्या दशकात ग्रेगोरियन कॅलेंडर आणले. ज्यात लीप वर्ष नियमांचे सुधारित स्वरूप होते आणि जानेवारी 1 ला अधिकृत नववर्ष म्हणून मान्यता दिली.
युरोपमधील बहुतांश देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर त्वरित स्वीकारले. पण ग्रेट ब्रिटन आणि त्याच्या वसाहतींनी 1752पर्यंत या प्रणालीला विरोध केला. नंतर ब्रिटिश संसदेत सुधारित प्रणाली स्वीकारण्यात आली.
आजही ज्या प्रदेशांमध्ये इस्लामी किंवा चंद्र आधारित कॅलेंडर सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. तेथेही ग्रेगोरियन कॅलेंडर आंतरराष्ट्रीय नागरी मानक म्हणून काम करते,ज्यामुळे जगभरातील सरकारे आणि व्यवसायांना एकत्रित करते.
भारतासारख्या देशाचा विचार केलात तर हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यात नव्या वर्षाला सुरुवात होते. अशी मान्यता आहे की या दिवशी ब्रह्माने या सृष्टीची रचना केली होती. या दिवशी देव-देवींची पुजा, अर्जना केली जाते. भारतात हिंदूंसोबत मुस्लिम लोकसंख्या देखील आहे. इस्लमामध्ये मोहरम महिन्यातील पहिल्या तारखेला नव वर्ष सुरू होते. याच दिवशी हजरत मोहम्मद मक्केवरून मदीनेला आले होते. इस्लाममध्ये मोहरम आणि रमजान या महिन्यांना फार महत्त्व आहे. हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मात प्रत्येकी 12 महिने आहेत.
शिख धर्मात नव्या वर्षाची सुरुवात बैसाखीपासून होते. नानकशाही कॅलेंडरनुसार प्रत्येक वर्षी 13 किंवा 14 एप्रिल रोजी नवे वर्ष साजरे केले जाते. या दिवशी 10वे गुरू गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापनी केली होती. वैशाख महिन्याची सुरुवात याच तारखेपासून होते. जैन धर्मात दिवाळीच्या आसपास नव्या वर्षाची सुरुवात होते. त्याला वीर निर्वाण संवत असे म्हटले जाते.
पारसी धर्मात नव्या वर्षाची सुरुवात नवरोजपासून होते. ही परंपरा 3 हजार वर्ष जुनी आहे. या दिवसाची सुरुवात पारशी राजी जमशेद यांनी केली होती. याला जमशेद-ए-नौरोज नावाने देखील ओळखले जाते. कारण त्यांनीच पारसी कॅलेंडर सुरु केले होते. विशेष म्हणजे वर्षातून दोन वेळा 21 मार्च आणि 16 ऑगस्ट रोजी नवरोज साजरा केला जातो. काही लोक पारसी कॅलेंडरनुसार तर काही जण शहंशाही कॅलेंडरनुसार न वर्ष म्हणजे नवरोज साजरा केला जातो.
ख्रिश्चन धर्मानुसार 1 जानेवारी रोजी नववर्ष साजरे केले जाते. भारतात देखील 1 जानेवारीपासून नव्या वर्षाची सुरुवात होते. 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवट असतो. जगातील जवळ जवळ सर्वच देशात हेच कॅलेंडर मानले जाते.