हत्तीचे मोठे शरीर आणि अतुलनीय ताकद त्याला जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी बनवते, त्याची त्वचाही सामान्यपेक्षा जाड असते, ज्यामुळे त्याचे नैसर्गिकरित्या मजबूत हल्ल्यांपासून संरक्षण होते. तर दुसरीकडे लहान पण अत्यंत विषारी किंग कोब्रा सापाचा दंश त्याला मारू शकतो की नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या या रहस्यमय खेळाच्या खोलवर जावे लागेल.
advertisement
त्वचेत कोब्राचे तीक्ष्ण दात घुसतात, पण...
जर आपण हत्तीच्या वैशिष्ट्यांकडे पाहिले, तर त्याचे वजन 2000 ते 14000 किलोग्रॅमपर्यंत असते आणि त्याची त्वचा सुमारे 1.5 ते 2 इंच जाड असते. ही त्वचा सामान्य जखमांमधून त्याचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी मजबूत असते. पण हत्तीची सोंड, पाय किंवा पोटाच्या खालच्या भागाची त्वचा बरीच मऊ असते, ज्यामध्ये किंग कोब्राचे तीक्ष्ण दात घुसू शकतात.
दुसरीकडे, जगातील सर्वात लांब आणि सर्वात विषारी साप किंग कोब्रा त्याच्या विषाच्या ताकदीसाठी कुख्यात आहे. कोब्राच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिनची मात्रा जास्त असते, ज्यामुळे कोणत्याही सजीवाची मज्जासंस्था त्वरित निकामी होऊ शकते. एका दंशात किंग कोब्रा 200-500 मिलीग्राम विष सोडतो, जे 20 माणसांना किंवा एका म्हशीला मारण्यासाठी पुरेसे आहे. पण जेव्हा हत्तीसारख्या मोठ्या प्राण्याचा प्रश्न येतो तेव्हा काय होते?
त्याचं विष शरीरात पोहोचणं कठीण
तसेच, किंग कोब्राच्या दातांची लांबी केवळ अर्धा इंच असते. याउलट, हत्तीची त्वचा सुमारे 1.5 ते 2 इंच जाड असते. इतकी लहान लांबी हत्तीच्या जाड त्वचेला भेदण्याची शक्यता खूप कमी असते. पण हत्तीच्या शरीराच्या मऊ भागांना चावा घेतल्यास काही परिणाम नक्की होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, किंग कोब्राचे विष हत्तीच्या रक्तात मिसळल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. पण हत्तीची जाड त्वचा असल्यामुळे कोब्राच्या दंशाचे विष रक्तात पोहोचणे जवळपास अशक्य आहे.
हत्तीचा मृत्यू होणे जवळपास अशक्य
विषामुळे हत्ती मरू शकतो का? वैज्ञानिक दृष्टिकोनातून, किंग कोब्राचे विष हत्तीला मारण्यासाठी पुरेसे असणे खूप कठीण आहे. हत्तीचे शरीर इतके मोठे असते की विषाचा प्रभाव तुलनेने कमी होतो. ज्या प्रमाणात विषामुळे माणूस किंवा लहान प्राणी मरू शकतो, ते प्रमाण हत्तीच्या शरीरात पसरण्यासाठी पुरेसे नसते. दुसरीकडे, कोब्राचे दात हत्तीच्या जाड त्वचेला भेदू शकत नाहीत. त्यामुळे विष हत्तीच्या रक्तात मिसळू शकत नाही, म्हणून हत्तीचा मृत्यू होणे जवळपास अशक्य आहे.
निसर्गातील या दोन शक्तिशाली प्राण्यांच्या लढाईचा प्रश्न लोकांची उत्सुकता वाढवतो. पण हत्तीची जाड त्वचा आणि किंग कोब्राच्या दातांची मर्यादित लांबी यामुळे, किंग कोब्रा हत्तीचा जीव घेऊ शकेल याची शक्यता सामान्यतः नसते. यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते की, निसर्गाने प्रत्येक सजीवाला अद्वितीय शक्ती आणि संरक्षण दिले आहे.
हे ही वाचा : तुम्ही किती वर्षे जगणार? 'ही' सोपी टेस्ट सांगणार तुमचं आयुष्य; घरबसल्या 30 सेकंदात जाणून घ्या!
हे ही वाचा : "दारू हवीय, बायकोची परवानगी आणा", या देशात दारू विकत घेण्यासाठी आहे विचित्र नियम!
