तुम्ही किती वर्षे जगणार? 'ही' सोपी टेस्ट सांगणार तुमचं आयुष्य; घरबसल्या 30 सेकंदात जाणून घ्या!

Last Updated:

SRT ही एक 30 सेकंदांची चाचणी आहे, जी घरबसल्या करता येते आणि तिच्या आधारावर तुमचं संभाव्य आयुष्य किती आहे, हे ओळखता येतं. ज्यांना आधार...

life expectancy test
life expectancy test
आपण किती दिवस जगणार, हे कोणालाच माहीत नाही. घरातील मोठी माणसं म्हणतात की, आपला जगण्याचा, मरण्याचा आणि लग्नाचा दिवस-वेळ देवानेच ठरवलेली असते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत कोण, कधी, कुठे आणि कसा मरेल, हे आधीच सांगणे शक्य नाही. पण आता शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे, ज्यामुळे तुम्ही फक्त 30 सेकंदात तुम्हाला अजून किती वर्ष जगायचे आहे, हे घरबसल्या एका सोप्या टेस्टद्वारे जाणून घेऊ शकता! हा काही विनोद नाही, तर हे एका वैज्ञानिक संशोधनाचेच फळ आहे.
'सिटिंग-रायझिंग टेस्ट' (SRT) आहे तरी काय?
या टेस्टला 'सिटिंग-रायझिंग टेस्ट' (SRT) म्हणजेच 'बसून-उठण्याची चाचणी' म्हणतात. ही चाचणी तुम्ही किती फिट आहात, तुमच्या स्नायूंमध्ये (muscles) किती ताकद आहे आणि तुमच्या शरीराचा समतोल (balance) व समन्वय (coordination) किती चांगला आहे, हे मोजते. 'युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी'मध्ये (European Journal of Preventive Cardiology) प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक तंदुरुस्तीचा आणि आयुष्याचा थेट संबंध असतो.
advertisement
संशोधनाचे धक्कादायक निष्कर्ष
हा अभ्यास 46 ते 75 वयोगटातील हजारो लोकांवर करण्यात आला होता. या लोकांचे 12 वर्षांपर्यंत निरीक्षण करण्यात आले आणि त्यानंतर जे निकाल समोर आले, ते पाहून सगळेच हैराण झाले. या चाचणीत ज्यांनी कमी गुण मिळवले, त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) मरण्याचा धोका 6 पट जास्त होता आणि इतर कोणत्याही कारणामुळे मरण्याचा धोका 3.8 पट जास्त होता! सोप्या भाषेत सांगायचं तर, जे लोक कोणत्याही आधाराशिवाय सहज बसू आणि उभे राहू शकतात, ते जास्त जगतात.
advertisement
ही चाचणी कशी करावी? आणि गुण कसे मिळवावे?
  • या चाचणीसाठी एकूण 10 गुण ठरलेले आहेत. (5 बसण्यासाठी आणि 5 उठण्यासाठी)
  • सगळ्यात आधी एक पाय दुसऱ्या पायाच्या पुढे ठेवून जमिनीवर बसायचा प्रयत्न करा.
  • असे बसताना तुम्ही हातांचा, कोपरांचा किंवा गुडघ्यांचा कोणताही आधार घेतल्यास, प्रत्येक आधारासाठी 1 गुण कमी करा.
  • बसल्यानंतर, त्याच पद्धतीने कोणत्याही आधाराशिवाय उभे राहा.
  • उभे राहताना प्रत्येक आधारासाठी पुन्हा 1 गुण कमी करा.
  • जर तुमचा तोल गेला, तर 0.5 गुण वजा करा.
  • मग तुम्हाला तुमचा अंतिम गुण दिसेल.
advertisement
एक महत्त्वाचा इशारा, ही चाचणी सर्वांसाठी नाही!
हा लेख वाचताच तुम्ही लगेच चाचणी करायला धावू नका, एक मिनिट थांबा. संशोधकांच्या मते, ही चाचणी एकट्याने करू नये. विशेषतः ज्यांना पाठदुखी (back pain), हाडांच्या समस्या (bone problems) किंवा सांधेदुखीचा (joint pain) त्रास आहे, त्यांनी ही चाचणी करू नये. यामुळे तुम्हाला धोका होऊ शकतो. जर तुम्हाला कोणतीही आरोग्य समस्या असेल, तर ही चाचणी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले राहील. तुमचा स्कोअर कमी आला तर नाराज होऊ नका. हे तुमचे नशीब नाही. उलट, हे एक संकेत आहे की तुमच्या शरीराला व्यायामाची गरज आहे.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुम्ही किती वर्षे जगणार? 'ही' सोपी टेस्ट सांगणार तुमचं आयुष्य; घरबसल्या 30 सेकंदात जाणून घ्या!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement