TRENDING:

या मुस्लीम देशात 'वेश्या व्यवसाय' आहे कायदेशीर, सरकार स्वतः देतं लायसन्स!

Last Updated:

वेश्याव्यवसायाला काही देशांत कायदेशीर मान्यता आहे, तर काही ठिकाणी हा गुन्हा मानला जातो. बांगलादेशमध्ये 2 लाखांहून अधिक महिला यामध्ये आहेत, त्यातील अनेकांना...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वेश्याव्यवसाय हा जगातील सर्वात जुना व्यवसाय असल्याचं म्हटलं जातं. हा व्यवसाय कधीच संपू शकत नाही. पैशांसाठी शारीरिक संबंध ठेवण्याच्या व्यवसायाला वेश्याव्यवसाय म्हणतात. याला सेक्स ट्रेड असंही म्हणतात. सेक्स ट्रेड हे अनैतिक काम मानलं जातं. वेश्याव्यवसायाबद्दलच्या सर्व गोष्टी नकारात्मक आहेत. सेक्स ट्रेडमध्ये काम करणाऱ्या महिलांना शारीरिक शोषणाला सामोरं जावं लागतं. त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करण्यास भाग पाडलं जातं.
prostitution legal countries
prostitution legal countries
advertisement

बहुतेक देशांच्या कायद्यांमध्ये वेश्याव्यवसायाशी संबंधित गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. काही देशांमध्ये ते बेकायदेशीर आहे, तर काहींमध्ये त्याला कायदेशीर मान्यता आहे. बहुतेक मुस्लिम देशांमध्ये वेश्याव्यवसायाबाबत कठोर कायदे आहेत. पण, एक मुस्लिम देश असाही आहे, जिथे हा व्यवसाय केवळ कायदेशीरच नाही, तर त्यासाठी परवानेही दिले जातात. जगातील सुमारे 49 देशांमध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे, म्हणजे तो बेकायदेशीर नाही. त्याच वेळी, काही देशांमध्ये या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे, पण काही अटींसह.

advertisement

बांगलादेशात 2 लाख महिला या व्यवसायात

बांगलादेशात वेश्याव्यवसाय सरकारद्वारे नियंत्रित केला जातो. एका स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) अहवालानुसार, बांगलादेशात सुमारे दोन लाख महिला वेश्याव्यवसायात गुंतलेल्या आहेत. बांगलादेशातील वेश्याव्यवसायाचा सर्वात मोठा भाग दौलतदिया असल्याचं सांगितलं जातं. या भागात सुमारे 1300 महिला या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. बांगलादेशात वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता असली, तरी जुगार आणि वेश्याव्यवसाय थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संविधानात तरतुदी करण्यात आल्या आहेत. बांगलादेश कायद्यानुसार, बाल वेश्याव्यवसाय, सक्तीचा वेश्याव्यवसाय आणि परवाना नसलेली वेश्याव्यवसाय केंद्रं निषिद्ध आहेत.

advertisement

या व्यवसायात सक्ती

बांगलादेशात 2000 सालापासून वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे, पण या व्यवसायात सक्ती करणं या मुस्लिम देशात चिंतेचा विषय बनला आहे. इथे लहान वयातच मुलींना वेश्याव्यवसायात ढकललं जातं. गरीब गावकरी, ज्यांना आपल्या मुलांचं पालनपोषण करणं कठीण जातं, ते मुलींना विकतात. यासाठी त्यांना काही हजार रुपये मिळतात. काही प्रकरणांमध्ये, दलाल लग्नाचं आमिष दाखवून मुलींना वेश्यालयात विकतात. त्यामुळेच बांगलादेशात अल्पवयीन मुलींचा वेश्याव्यवसाय ही गंभीर समस्या आहे. एका अंदाजानुसार, सध्या 29000 हून अधिक मुली या दलदलीत अडकल्या आहेत.

advertisement

या देशात वेश्या सरकारला कर भरतात

बांगलादेशप्रमाणेच युरोपीय देश ऑस्ट्रियामध्येही वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे. यात गुंतलेल्या महिलांच्या आरोग्याची काळजीही सरकार घेतं. ऑस्ट्रियामध्ये या व्यवसायात सामील होणाऱ्या महिलांची नोंदणी केली जाते. त्यानंतर वेळोवेळी त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. इथे किमान 19 वर्षांची मुलगीच हा व्यवसाय स्वीकारू शकते. इथे महिला आपल्या कमाईवर सरकारला कर भरतात. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियामध्ये वेश्याव्यवसायाबाबत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. काही राज्यांमध्ये त्याला कायदेशीर दर्जा आहे, तर काहींमध्ये ते बेकायदेशीर आहे. ऑस्ट्रेलियातही वेश्याव्यवसाय केंद्रांसाठी परवाना प्रणाली आहे. बेल्जियममध्ये वेश्याव्यवसायासाठी परवाना दिला जातो. इथे हा व्यवसाय कला मानला जातो.

advertisement

न्यूझीलंडमध्ये अशा महिलांसाठी पेन्शन

न्यूझीलंडमध्ये 2003 मध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर करण्यात आला. यासाठी सार्वजनिक आरोग्य आणि रोजगार कायद्यांतर्गत वेश्याव्यवसाय केंद्रांना परवाने दिले जातात. इथे काम करणाऱ्या महिलांना इतर क्षेत्रात काम करणाऱ्यांसारखे सामाजिक फायदे मिळतात. वेश्याव्यवसायाच्या बाबतीत, नेदरलँड्समधील ॲमस्टरडॅमचा रेड लाईट एरिया जगातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. दुसरीकडे, जर्मनीमध्ये वेश्याव्यवसायाला प्रथम कायदेशीर अधिकार देण्यात आले. इथे 1927 पासून वेश्याव्यवसायासाठी परवाना प्रणाली आहे. या व्यवसायाशी संबंधित महिलांना आरोग्य सुविधांसोबतच विमाही दिला जातो. जर्मनीमध्ये सेक्स वर्कर्स त्यांच्या कमाईवर करही भरतात. इतकंच नाही, तर त्यांच्यासाठी पेन्शन योजनाही आहे.

हे ही वाचा : Periods : पाळीच्या दिवसातल्या पायदुखीवर हे उपाय करुन बघा, वेदना होतील कमी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

हे ही वाचा : फक्त 72 तास ही सवय सोडून द्या, ब्रेनची केमिस्ट्री जाईल बदलून आणि तल्लख होईल मेंदू!

मराठी बातम्या/General Knowledge/
या मुस्लीम देशात 'वेश्या व्यवसाय' आहे कायदेशीर, सरकार स्वतः देतं लायसन्स!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल