TRENDING:

जगातल्या सर्वात खतरनाक बाॅर्डर्स, यापुढे भारत-पाकिस्तान सीमा काहीच नाही! दरवर्षी जातोय हजारो लोकांना बळी

Last Updated:

जगातील काही सीमा अत्यंत धोकादायक आहेत. अमेरिका-मेक्सिको, इस्रायल-सीरिया, उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया यांसारख्या सीमांवर सतत संघर्ष आणि हिंसाचार होत असतो. भारत-पाकिस्तान सीमा देखील धोकादायक आहे, पण...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जगात अनेक सीमेवर तणाव आणि संघर्ष असतो. काही सीमेवरील परिस्थिती इतकी बिकट आहे की, भारत-पाकिस्तान सीमेपेक्षाही त्या अधिक धोकादायक मानल्या जातात. या सीमेवर हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया अशाच काही धोकादायक सीमा आणि त्यांच्याशी संबंधित संघर्षांविषयी...
News18
News18
advertisement

1) पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा (ड्युरंड लाईन)

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यानची ड्युरंड लाईन ही 1,510 मैल लांब आहे. ही सीमा अनेक दशके वादग्रस्त राहिली आहे. तालिबानने आणि नंतर 2001 मध्ये अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही यावर दावा केला होता. 2003 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला. त्यानंतर 2007 पासून पाकिस्तानने सीमा कुंपण घालण्यास सुरुवात केली. तरीही, येथे सातत्याने हिंसाचार होतो.

advertisement

2) अमेरिका-मेक्सिको सीमा

अमेरिका आणि मेक्सिकोमधील सीमा 1,989 मैल लांब आहे. ही सीमा कॅलिफोर्नियापासून टेक्सासपर्यंत पसरलेली आहे. दरवर्षी लाखो लोक येथे बेकायदेशीररीत्या प्रवेश करतात. मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि मानव तस्करीही येथे होते. जवळपास 20,000 सीमा सुरक्षा अधिकारी येथे तैनात आहेत, तरीही प्रत्येक वर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो.

3) इस्रायल-सिरीया सीमा

advertisement

इस्रायल आणि सिरियामधील सीमा सातत्याने तणावाखाली असते. यामुळे या भागात युद्धजन्य परिस्थिती राहते. गेल्या दोन वर्षांत येथे मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले आहेत. पॅलेस्टाईनने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर संपूर्ण गाझा पट्टा उद्ध्वस्त झाला आहे. सध्या अमेरिका या भागावर नियंत्रण मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

4) थायलंड-कंबोडिया सीमा

थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवरही तणावपूर्ण परिस्थिती असते. येथे अनेक वेळा सैनिकांमध्ये संघर्ष झाले आहेत. प्रवास करताना येथे विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

advertisement

5) सुदान आणि दक्षिण सुदान सीमा

सुदान आणि दक्षिण सुदान यांच्यातील सीमा सुमारे 2,000 किमी लांब आहे. हा भाग तेलसंपन्न असल्याने येथे संघर्ष वाढले आहेत. यामुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. दोन्ही देशांमध्ये या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने लढाया झाल्या आहेत.

6) भारत-पाकिस्तान सीमा

भारत आणि पाकिस्तानमधील सीमा 1,800 मैल लांब आहे. ही जगातील सर्वात जास्त संरक्षित सीमा आहे. भारतीय भागात लावलेले उच्च-व्होल्टेज फ्लड लाईट्समुळे ही सीमा अंतराळातूनही दिसते. 1947 नंतर दोन्ही देशांमध्ये या सीमेवर तीन युद्धे झाली आहेत. विशेषतः काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याने येथे सातत्याने चकमकी होत असतात. आतापर्यंत येथे 50,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

advertisement

या सर्व सीमा जगातील सर्वात धोकादायक मानल्या जातात, जिथे सतत संघर्ष, हिंसा आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.

हे ही वाचा : असं ठिकाण जिथं पुरुषांना एकटं जायला मनाई, काय आहे कारण?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डिटॉक्स ड्रिंक घेताय? खरंच शरीर साफ होत का? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर
सर्व पहा

हे ही वाचा : पती-पत्नी एकत्र बाथरूममध्ये, झाला नको तोच कांड, रडत रडत पोलिसात धाव

मराठी बातम्या/General Knowledge/
जगातल्या सर्वात खतरनाक बाॅर्डर्स, यापुढे भारत-पाकिस्तान सीमा काहीच नाही! दरवर्षी जातोय हजारो लोकांना बळी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल