पती-पत्नी एकत्र बाथरूममध्ये, झाला नको तोच कांड, रडत रडत पोलिसात धाव

Last Updated:

Couple cyber crime video : कपलला एका अज्ञात फोन नंबरवरून एक व्हिडीओ आला. जो त्यांच्या घराच्या बाथरूमचा होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांची रात्रीची झोप उडाली आणि दिवसाची शांती हिरावून घेतली.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated image)
लखनऊ :  पती-पत्नी म्हणजे त्यांच्यात रोमान्स आलाच. असंच एक कपल जे बाथरूममध्ये एकत्र होतं. बाथरूममध्ये दोघांनी एकत्र काही तरी केलं की शेवटी त्यांच्यावर रडण्याची वेळ आली. नवरा-बायकोने रडत रडत थेट पोलिसात धाव घेतली. उत्तर प्रदेशमधील ही धक्कादायक घटना आहे, जी चर्चेत आली आहे.
लखनऊच्या गोल्फ सिटीतील हे प्रकरण. इथं राहणाऱ्या एका कपलला 11 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता पती-पत्नीला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्या जोडप्याने मेसेज उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मेसेजमध्ये एक व्हिडीओ होता. हा व्हिडिओ त्याच्या घराच्या बाथरूमचा होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांची रात्रीची झोप उडाली आणि दिवसाची शांती हिरावून घेतली.
advertisement
व्हिडीओमध्ये काय होतं?
या व्हिडिओमध्ये पती-पत्नी बाथरूममध्ये आंघोळ करताना दिसत होते. कपल धावत बाथरूममध्ये गेलं आणि त्यांनी तपासलं तर बाथरूमच्या छतावर एक छिद्र आढळून आलं. कुणीतरी त्यांचा व्हिडीओ शूट केला होता आणि तो व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करत होता. हा व्हिडिओ पाठवून अज्ञाताने कपलकडे 6 कोटी रुपयांची मागणी केली. 6 कोटी रुपये घेऊन त्याने कपलला गोमती नगरला बोलावलं.
advertisement
कपलची पोलिसात धाव
जोडप्याने मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. बाथरूममध्ये छुप्या कॅमेऱ्याचा वापर करून कोणीतरी त्यांचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता, असं या जोडप्याने पोलिसांना सांगितलं. पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ लीक करण्याची धमकी त्याने दिली. यावर सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. सध्या त्या अज्ञात तरुणाचा कोणताही पत्ता नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
पती-पत्नी एकत्र बाथरूममध्ये, झाला नको तोच कांड, रडत रडत पोलिसात धाव
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement