हनिमून हा शब्द कुठून आला?
हनिमून हा शब्द जुन्या इंग्रजी शब्दांपासून बनलेला आहे. ज्यामध्ये 'हनी' आणि 'मून' चा समावेश आहे. या शब्दात 'हनी' म्हणजे नव्या लग्नाची गोडी आणि आनंद. लग्नानंतर लगेचच नात्यातील गोडी मधाशी जोडली जाते. याशिवाय, युरोपमध्ये लग्नादरम्यान नवविवाहित जोडप्यांना मध आणि पाण्यापासून बनवलेले अल्कोहोलिक पेय दिलं जातं. म्हणूनच लग्नानंतरचा काळ मधाशी जोडला गेला आहे. 'मून' हा शब्द चंद्राच्या चक्राबद्दल सांगतो, जो एक महिन्याचा असतो. अशा परिस्थितीत, लग्नानंतरचा एक महिन्याचा काळ हनिमून असतो, जो सर्वोत्तम आणि गोड असतो.
advertisement
हा शब्द पहिल्यांदा कधी वापरला गेला?
फ्रेंचमध्ये याला 'ल्यून डी मील' म्हणतात. जर्मनमध्ये याला 'फ्लिटरवोचेन' म्हणतात. हनिमून हा शब्द 18 व्या शतकापासून फ्रान्समध्ये वापरला जातो. मात्र, 19 व्या शतकात हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला. वर्ल्डवाइड वर्ड्स वेबसाइटच्या एका रिपोर्टनुसार, हनिमून हा शब्द 16 व्या शतकात रिचर्ड हुलोट नावाच्या व्यक्तीने पहिल्यांदा वापरला होता. हनिमून हा शब्द पहिल्यांदा बॅबिलोनमध्ये वापरला गेला, असाही एक दृष्टिकोन आहे. असं म्हटलं जातं की, बॅबिलोनमध्ये लग्नानंतर वधूचे वडील लग्नाच्या एक महिन्यानंतर वराला भेट म्हणून मधापासून बनवलेली वाईन द्यायचे. ते चंद्र कॅलेंडरनुसार दिलं जायचं. त्याला 'हनीमंथ' म्हणायचे, जे हळूहळू 'हनीमंथ' वरून 'हनिमून' झालं.
हे ही वाचा : तरुणीने 11 कोटी रुपयांची जिंकली लाॅटरी, पहिल्यांदा बाॅयफ्रेंडशी केलं ब्रेकअप, आता नव्या मुलासोबत करतेय ऐश!
हे ही वाचा : चेहरा विकून मिळवले 1.60 लाख रुपये, पण सत्य कळताच महिलेला होतोय पश्चात्ताप, नेमकं प्रकरण काय?
