2 धातुंचं मिश्रण
10 रुपयांच्या नाण्याचं वजन 7.71 ग्रॅम आहे. बाहेरील भागाबद्दल बोलायचं, तर तो क्युप्रो निकेलपासून बनलेला आहे. भारतात चलनात असलेलं 10 रुपयांचं नाणं सहसा दोन धातूंच्या मिश्रणातून बनवलं जातं. याला बायमेटॅलिक नाणं म्हणतात. या नाण्याचं धातू घटक तपशीलवार जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
वजनानुसार नाणं बनवण्याचा खर्चही वेगळा
त्याचं केंद्र म्हणजे मधला भाग 75 टक्के तांबे आणि 25 टक्के निकेलपासून बनलेला आहे. जर आपण बाहेरील वर्तुळाबद्दल बोललो, म्हणजे पिवळ्या भागाबद्दल, तर ते ॲल्युमिनियम कांस्यपासून बनलेलं आहे. त्यात 92 टक्के तांबे, 6 टक्के ॲल्युमिनियम आणि 2 टक्के निकेल असतं. हे नाणं बनवण्यासाठी सरकार किती खर्च करतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? प्रत्येक नाणं बनवण्याचा खर्च वेगवेगळा असतो. नाण्यातील धातू आणि वजनानुसार प्रत्येक नाणं बनवण्याचा खर्चही वेगवेगळा असतो.
advertisement
नाणी बनवण्यासाठी किती खर्च येतो?
एक रुपयाचं नाणं बनवण्यासाठी सरकारला 1 रुपया 11 पैसे खर्च येतो. 2 रुपयांचं नाणं बनवायला 1.28 रुपये खर्च येतो. 5 रुपयांच्या नाण्याला 3.69 रुपये खर्च येतो आणि 10 रुपयांच्या नाण्याला 5.54 रुपये खर्च येतो. हा खर्च 2018 नुसार होता, जो RBI ने स्वतः सांगितला होता. ही सर्व नाणी केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केली जातात. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे चार टांकसाळींमध्ये चलनी नाण्यांची निर्मिती केली जाते. ही कार्यालये मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा येथे आहेत.
हे ही वाचा : घटस्फोट झालाच होता, निकाल बाकी होता, न्यायाधिशांनी असा निर्णय दिली की, पती बसला धक्का!
हे ही वाचा : यूट्यूब पाहिलं, साहित्य आणलं, नंतर पोट फाडलं अन् त्याने स्वतःच स्वतःचं केलं ऑपरेशन, पण...
