यूट्यूब पाहिलं, साहित्य आणलं, नंतर पोट फाडलं अन् त्याने स्वतःच स्वतःचं केलं ऑपरेशन, पण...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
वृंदावनच्या 32 वर्षीय राजा बाबू याने यूट्यूब व्हिडिओ पाहून स्वतःचे पोट ऑपरेशन करण्याचा धक्कादायक प्रयोग केला. त्याला दीर्घकाळ पोटदुखीचा त्रास होत असल्याने आणि...
आजच्या काळात सोशल मीडिया लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोकांचा निम्म्याहून अधिक वेळ सोशल मीडियावर सर्फिंग करण्यात जातो. कोणतीही माहिती हवी असल्यास, लोक थेट गुगल बाबांकडे जातात. याशिवाय, लोकांनी मनोरंजन आणि ज्ञानासाठी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहायला सुरुवात केली आहे. पण, मथुरा येथील वृंदावनमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने या बाबतीत सर्वांना मागे टाकलं आहे.
यूट्यूबवर बघून स्वतःच्या पोटाचं केलं ऑपरेशन
या तरुणाने सोशल मीडिया साइट युट्युबच्या मदतीने स्वतःची शस्त्रक्रिया केली. होय, तुम्ही बरोबर वाचलं. या व्यक्तीने प्रथम युट्युबवर पोटात शस्त्रक्रिया कशी करायची हे शोधलं. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ अनेक वेळा पाहिला. जेव्हा त्याला खात्री झाली की, त्याने सर्व स्टेप्स लक्षात ठेवल्या आहेत, तेव्हा त्याने ब्लेड उचलून पोट फाडून शस्त्रक्रिया सुरू केली. यानंतर, त्याने त्याच्या पोटाला अकरा टाकेही घातले. पण थोड्याच वेळात त्याची प्रकृती बिघडायला लागली, त्यामुळे तो मदतीसाठी ओरडू लागला.
advertisement
पोटदुखीने त्रस्त असलेल्या तरुणाने केलं कृत्य
पोटदुखीने त्रस्त असलेला हा तरुण वृंदावनमधील सुनरखचा रहिवासी आहे. 32 वर्षीय तरुणाचं नाव राजाबाबू आहे. त्याला बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्याची ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याला सतत पोटदुखीचा त्रास होत होता. डॉक्टरांनाही या वेदनांचं कारण सांगता आलं नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा सर्व औषधं निष्प्रभ ठरली, तेव्हा राजाबाबूंनी स्वतः शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. बीबीए शिक्षण घेतलेल्या या तरुणाने शस्त्रक्रियेसाठी युट्युबची मदत घेतली.
advertisement
राजाबाबूंनी आधीच तयारी केली होती
त्याने प्रथम युट्युबवर पोटात शस्त्रक्रिया कशी करायची हे शोधलं. त्यानंतर, त्याने शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गोष्टींची यादी तयार केली आणि त्या वैद्यकीय दुकानातून खरेदी केल्या. तरुणाने ब्लेड, भूल देणारी औषधं, सुया आणि टाके घालण्यासाठी प्लास्टिकचे दोरे खरेदी केले. त्यानंतर, त्याने बुधवारी घरी शस्त्रक्रिया सुरू केली. सुरुवातीला, भूल देणाऱ्या इंजेक्शनमुळे त्याला कोणतीही वेदना जाणवली नाही. या स्थितीत त्याने पोट कापून नंतर टाके घातले. पण जेव्हा औषधाचा प्रभाव कमी झाला, तेव्हा तो वेदनेने ओरडू लागला. त्याला जिल्हा संयुक्त रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला आग्रा एसएन रुग्णालयात पाठवलं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 20, 2025 4:42 PM IST
मराठी बातम्या/Viral/
यूट्यूब पाहिलं, साहित्य आणलं, नंतर पोट फाडलं अन् त्याने स्वतःच स्वतःचं केलं ऑपरेशन, पण...


