ईश्वराच्या भक्तीत तल्लीन झाल्या परदेशी महिला, त्यांची भजनं ऐकून भारतीय चकित!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात दोन फ्रेंच महिला पर्यटक मेरी (29) आणि वारेली (62) यांनी भारतीय सनातन संस्कृती आणि भक्ती परंपरेबद्दल आपली श्रद्धा व्यक्त केली. हेरिटेज हॉटेलमध्ये झालेल्या संगीत...
'सनातन'चा प्रतिध्वनी आता भारताच्या सीमा ओलांडत आहे. सनातन आता केवळ भारतातच नाही, तर परदेशातही ऐकू येत आहे. परदेशी लोकही सनातनाकडे आकर्षित होत आहेत. तेही भक्तीत तल्लीन होत आहेत. झुंझुनू जिल्ह्यात असंच एक उदाहरण पाहायला मिळालं. फ्रान्समधून राजस्थानच्या भेटीला आलेल्या दोन महिला पर्यटक सनातनाच्या प्रेमात वेड्या झाल्या आहेत. झुंझुनूच्या मंडावा येथे भेटायला आलेल्या फ्रेंच पर्यटक मेरी आणि वारेली यांची भक्ती पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी आपल्या भक्तीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. मेरी खूप चांगली भजनं गाते. तिच्या भजनावर लोक नाचतात.
चक्क भजन गातेय ही परदेशी मुलगी
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सची 29 वर्षीय मेरी नावाची महिला केवळ पूजा-पाठच करत नाही, तर भजनंही गाते. यासाठी ती हार्मोनियम आणि टाळही सोबत ठेवते. मंडावाच्या हेरिटेज हॉटेलचे ऑपरेटर मधुसूदन खेमानी यांनी सांगितलं की, अलीकडेच मेरी आणि तिची 62 वर्षीय सहकारी वारेली हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमध्ये दररोज रात्री संगीताचा कार्यक्रम असतो.
advertisement
रात्रभर देशी-विदेशी पर्यटक भक्तीत तल्लीन झाले
पहिल्या दिवशी राजस्थानी गाणी आणि संगीताचा कार्यक्रम होता. त्यात मेरीने सांगितलं की, ती भजनं गाते. दुसऱ्या दिवशी मेरीसाठी खास व्यवस्था करण्यात आली. मेरीने तिच्या हार्मोनियमवर आणि वैरेलीने टाळावर एकामागून एक भजनं सादर केली. त्यांची भक्ती पाहून देशी-विदेशी पर्यटकही मंत्रमुग्ध झाले. सर्वांनी रात्रभर भजनांचा आनंद घेतला आणि भक्तीत नाचले.
advertisement
भारतीय तरुणांनी परदेशी महिलांकडून प्रेरणा घ्यावी
मेरीने संभाषणात सांगितलं की, फ्रान्समध्ये तिचा एक पूर्ण गट आहे जो भजनं सादर करतो. तिला भारतीय संस्कृती आणि सनातन धर्मावर खूप विश्वास आहे. याप्रसंगी विशाखापट्टणमचे अनुज जोशी, कोलकाताचे कविना-अखिलेश जोशी, राजस्थान ब्राह्मण महासभेचे झुंझुनू जिल्हाध्यक्ष अरविंद पारीक, मधुसूदन खेमानी, प्रल्हादराय देवडा इत्यादींनी मेरी आणि वैरेलीचे स्वागत केले. ते म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतीकडे वळणाऱ्या आजच्या भारतीय तरुणांनी मेरीसारख्या परदेशी महिलांकडून प्रेरणा घ्यावी.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 20, 2025 4:22 PM IST


