प्रवाशाच्या पायात वेदना, पायलटसह इतर प्रवाशीही थरथर कापू लागले, कारण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plane news : उड्डाणात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विमानाला कॅनडातील व्हँकुव्हर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.
नवी दिल्ली : विमानातून प्रवास करताना अचानक कोणाची प्रकृती बिघडली की प्लेनचं एमर्जन्सी लँडिंग करावं लागतं. अशाच विमानातील एक प्रवासी ज्याच्या पायात वेदना होऊ लागल्या. ज्यामुळे पायलटसह सगळे प्रवासी थरथर कापू लागले आणि प्लेन एमर्जन्सी लँड करण्यात आलं.
अलास्का एअरलाइन्स फ्लाइट 561. सुमारे 45 हजार फूट उंचीवर काहीतरी घडलं, ज्यामुळे विमानातील सर्व प्रवासी घाबरले. विमानातील परिस्थिती बिघडल्यामुळे विमानाचे व्हँकुव्हर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.
विमान लॉस एंजेलिसहून पोर्टलँडला निघाले. उड्डाणानंतर काही वेळातच एका प्रवाशाला खालच्या पायात तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्याला जणू कोणीतरी त्याचा पाय चावल्यासारखे वाटले. या वेदनेमुळे प्रवाशी जोरात ओरडला. जेव्हा प्रवाशाने त्याचा पाय कोणी चावला आहे हे शोधण्यासाठी जमिनीकडे पाहिलं तेव्हा त्याला तिथं असे काहीतरी दिसलं ज्यामुळे तो भीतीने थरथर कापू लागला.
advertisement
खरंतर एक धोकादायक विंचू जमिनीवर चालत होता आणि याच विंचूने प्रवाशाच्या पायाला चावा घेतला. त्याच वेळी, विंचूची उपस्थिती कळताच, संपूर्ण फ्लाइटमध्ये घबराट पसरली. विंचूच्या दंशापासून वाचण्यासाठी सर्व प्रवासी पाय दुमडून आपापल्या जागांवर बसले.
त्याचवेळी विमानातील वातावरण बिघडल्यामुळे आणि प्रवाशांना वैद्यकीय मदत देण्यासाठी, पायलटने कॅनडातील व्हँकुव्हर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. हवाई वाहतूक नियंत्रणाकडून परवानगी मिळाल्यानंतर, विमानाचे व्हँकूवर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. जिथं प्रवाशाला वैद्यकीय उपचार देण्यात आले आणि विमानाची पुन्हा एकदा कसून तपासणी करण्यात आली.
advertisement
30 ऑक्टोबर 2015 रोजी घडलेली ही घटना एक दुर्मिळ आणि अनोखी घटना होती, जेव्हा उड्डाणादरम्यान विमानात विंचूसारखा धोकादायक प्राणी दिसला आणि त्याने एका प्रवाशाला दंश केला. तथापि, विमानात हा विंचू कुठून आला हे नंतरही स्पष्ट होऊ शकले नाही.
view commentsLocation :
Delhi
First Published :
March 20, 2025 9:56 AM IST


