TRENDING:

अंबरनाथमध्ये डाव पलटला, श्रीकांत शिंदेंनी एका रात्रीत गेम फिरवला; भाजपला मोठा धक्का

Last Updated:

अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंनी मोठी राजकीय खेळी करत भाजपला धक्का दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेतील गेल्या महिनाभरापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. येथील घडामोडींची चर्चा राज्यात नाही तर दिल्लीत देखील झाली. अंबरनाथमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी थेट काँग्रेसशी युती केली  . ही विचित्र युती देशभरात चर्चेचा विषय ठरली. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या 12 नगरसेवकांचं निलंबन केलं. या नगरसेवकांना भाजपनं आपल्या पक्षात घेतलं. सत्ता स्थापनेचा दावा केला. पण आता श्रीकांत शिंदेंनी मोठी राजकीय खेळी करत भाजपला धक्का दिला आहे. शिंदेसेनेने आता थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्य 4 नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

एकनाथ शिंदेंच्या सेनेने भाजपला धक्का धेत भाजप सोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं आहे. अंबरनाथमध्ये भाजपा सोबत सत्तेत शामिल झालेले चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक ठाणे जिल्हाधिकारी यांना भेटून आपला भाजपाला पाठिंबा नाहीये असं पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे चारही नगरसेक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

नेमकं काय झालं अंबरनाथमध्ये?

अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणा शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना काही दिवसांपूर्वी मोठा धक्का दिला होता. अंबरनाथमध्ये झालेल्या नगपालिका निवडणुकी एकनाथ शिंदेंची सेना, भाजप स्वबळावर लढले. शिंदेसेनेला सर्वाधिक 27, तर भाजपला 14 जागा मिळाल्या. पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत भाजपनं शिंदेसेनेला धक्का दिला. शिवसेनेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी भाजपनं हालचाली सुरु केल्या. त्यासाठी 12 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला आणि 4 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यात आलं. भाजपनं सत्तेसाठी काँग्रेसशी युती केल्यानं देशभर चर्चा झाली .

advertisement

श्रीकांत शिंदेंनी कसा गेम फिरवला?

काँग्रेसनं त्यांच्या 12 नगरसेवकांचं थेट निलंबन केलं. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दुसऱ्याच दिवशी या बाराही नगरसेवकांना भाजपमध्ये घेतलं. काँग्रेसचे निलंबित नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आधारे भाजपनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी चव्हाण यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला, मात्र श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत भाजपला मोठा धक्का देत सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र देणार आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

माझ्या नातवाचे तिकीट कापले, आजीने थेट भाजप मंत्र्याची अडवली वाट; नाद खुळा व्हिडीओ व्हायरल

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
अंबरनाथमध्ये डाव पलटला, श्रीकांत शिंदेंनी एका रात्रीत गेम फिरवला; भाजपला मोठा धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल