स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपात जोरदार इनकमिंग सुरू झालं आहेकल्याण डोंबिवलीत तर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपनं गळाला लावलं आहे. यावरून शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर एकनाथ शिंदे वगळता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आणि थेट मुख्यमंत्री फडणवीसांचे कार्यालय गाठले आणि तक्रार केली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही शिवसेनेच्या मंत्र्यांनाही खडसावल आहे. तसेच दोन्ही पक्षांनी पथ्यं पाळली पाहिजे, अशा सूचना दिल्या.त्यानंतरही भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ऑपरेशन लोटस सुरूच राहणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
रविंद्र चव्हाण म्हणाले, राज्यभरात भाजपात इनकमिंग सुरुच राहणार आहे. ज्यामध्ये शिवसैनिकांचा जास्त भाग सहभाग असणार आहे. तसच राज्यभरात भाजपाचे ॲापरेशन कमळ जोरात चालवणार आहे. महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार आहे. मित्र पक्ष आमचे असून आमच्यात समन्वय झाला आहे.
प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
निवडणुका सुरू आहेत पक्ष प्रवेश सुरू आहेत. त्यामुळे थोडीशी नाराजी होती. जी नाराजी आहे याबाबत चर्चा झाली आहे. कुणीही महायुती मधील नेते पदाधिकारी नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत असे ठरल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
निवडणुकीत काय पडसाद उमटणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या इनकमिंगमुळं शिवसेना आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण रंगलंय .यातूनच महायुतीत नाराजीचा विस्फोट झालाय. सध्या मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीला ब्रेक लावत शिवसेनेच्या मंत्र्यांची समजूत काढलीय. पण, त्याआधी जी फोडाफोडी झालीय, त्याचे आगामी निवडणुकीत काय पडसाद उमटतात? हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा:
