Maharashtra Politics: शिवसेना-भाजपमध्ये शीतयुद्ध, 'त्या' प्रवेशावरुन दोघे भिडले; वादाची ठिणगी कुठे पडली?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
शिवसेना आणि भाजपमध्ये सात पक्ष प्रवेशावरून ठिणगी पडल्याचे समोर आले आहे.
मुंबई : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सुरू आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसवर शिंदेंची शिवसेना नाराज आहे. त्याचमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. शिंदेच्या जवळचे माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, छ. संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या बड्या स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपनं अंधारात ठेऊन पक्षप्रवेश दिल्याची तक्रार केली. तसेच भाजपकडून युती धर्माचं पालन होत नसल्याचे देखील म्हटलं आहे. मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये कोणत्या पक्ष प्रवेशावरून ठिणगी पडली याविषयी माहिती घेऊया
महायुतीतील भाजपा आणि शिवसेने यत पक्ष प्रवेशावरुन सुरू असलेला वाद हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि ८ नगरसेवक शिवसेनेने फोडले. एवढच नाही तर तर कल्याण- डोंबिवली मनपा निवडणुकीकरता भाजपने निश्चित केलेले उमेदवार शिवसेनेने घेतले . यानंतर उल्हासनगरमधून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाला पाठिंबा देणा-या ओमी कलानी आणि इतर स्थानिक पक्षांसोबत शिवसेनेने जुळते करुन घेतले. एवढ्यावरच नाही तर उल्हासनगरमधीलच भाजपाचे नगरसेवक ज्यांना पक्षातून बडतर्फ केले जाणार होते त्यांना शिवसेनेने घेतले.
advertisement
शिवसेनेने केलेल्या कुरघोड्यांचा वचपा भाजपने कसा काढला?
शिवसेनेने केल्या कुरघोड्यांचा वचपा भाजपने काढला आहे. याचा वचपा म्हणून ओमी कलानी यांच्या सोबतचे 7-8 नगरसेवक भाजपाने घेतले . यानंतर अंबरनाथमधून शिवसेना सोडणारे शिवसैनिक यांना भाजपाने आपल्या गळाला लावले . यानंतर प्रकाश निकम पालघर जिल्हापरीषदेचे अपक्ष होते जे शिवसेनेला पाठींबा देणार होते त्यांना भाजपाने आपल्याकडे वळवले आहे. कैलास म्हात्रे पालघरचे शिवसेना उबाठाचे शिवसेनेत जाणार होते त्यांना भाजपाने आपल्या गळाला लावले.
advertisement
शिवसेना X भाजप ठिणगीची कारणं…
- शंभूराज देसाई vs सत्यजित पाटणकर (भाजप प्रवेश)
- भरत गोगावले Vs स्नेहल जगताप (राष्ट्रवादी काॅग्रेस प्रवेश)
- दादा भुसे Vs अद्वैय हिरे (भाजप प्रवेश)
- किशोर आप्पा पाटील Vs वैशाली सुर्यंवशी (भाजप प्रवेश)
- सुहास बाबर Vs वैभव पाटील (भाजप प्रवेश)
- महेंद्र दळवी Vs सुधाकर घारे (राष्ट्रवादी प्रवेश
- संजय शिरसाट Vs राजू शिंदे
advertisement
याचा वचपा म्हणुन डोंबिवलीचे भाजपाचे विकास म्हात्रे आणि 3 नगरसेवक शिवसेनेने आपल्या गळाला लावले तसंच अंबरनाथ मधील भाजपाचे नगरसेवक शिवसेनेने आपल्या पक्षात घेतले . आज शिवसेनेचे महेश पाटील, सुनिता पाटील, अनमोल म्हात्रे, सायली विचारे, संजय विचारे नगरसेवक यांचा भाजपाने पक्ष प्रवेश केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 7:18 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Maharashtra Politics: शिवसेना-भाजपमध्ये शीतयुद्ध, 'त्या' प्रवेशावरुन दोघे भिडले; वादाची ठिणगी कुठे पडली?


