कल्याण डोंबिवलीत 122 जागांपैकी शिवसेनेने 52 तर भाजपने 51 जागा जिंकल्या आहेत महापालिकेत सत्तास्थापनेसाठी 62 जागांची गरज असताना महायुतीतील दोन्ही पक्षांना स्वतंत्रपणे हा आकडा गाठता आला नाही. हे दोन्ही पक्ष महापौरपदासाठी अडून बसल्यास शिवसेना उबाठाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 11 नगरसेवक निवडून आले होते. तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत.
advertisement
कल्याण डोंबिवलीत नेमकं काय सुरू आहे?
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 53,भाजपचे 50,ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 तर मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत .महापौरपदाच्या शर्यतीत 53 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मनसेच्या पाच जणांनी पाठिंबा दिलाय, हे संख्याबळ 58 इतकं होतं. त्याचसोबत नॉटरिचेबल असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे चार नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळं भाजपचे 53, मनसेचे पाच, ठाकरेंचे नॉटरिचेबल असलेले चार नगरसेवक असे मिळून बहुमत गाठत संख्याबळ 62 होतं.
कट्टर 7 नगरसेवक कोण आहेत?
भाजप आणि शिवसेना यांच्यात असलेल्या महापौर पदाच्या रस्सीखेचमुळे फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला. ठाकरेंच्या 11 नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक नॉट रिचेबल आणि दोन नगरसेवक गटस्थापनेला उपस्थित नव्हते. त्यामुळे सध्या ठाकरेंकडे केवळ 7 नगरसेवक आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेलेले 7 नगरसेवक कोण आहेत? याची यादी आपण पाहणार आहे.
| अ.क्र. | नाव |
|---|---|
| 1 | तेजश्री गायकवाड |
| 2 | उमेश बोरगांवकर |
| 3 | अपर्णा भोईर |
| 4 | संकेश भोईर |
| 5 | विशाल गारवे |
| 6 | वंदना महिले |
| 7 | निलेश खंबाय |
ठाकरे गटाच्या 7 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. राहुल कोट, स्वप्नाली केणे , मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे या चार नगरसेवकांना वगळून 7 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला आहे. उमेश बोरगावकर यांची गटनेता पदी नियुक्ती करण्यात आली. तर संकेश भोईर यांची प्रतोद पदी निवड करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
