आधी विश्वास जिंकला, मग खिसा कापला
मिळालेल्या माहितीनुसार, दिलप्रीत गरेवाल यांच्याकडील संपूर्ण ओरिजनल आणि वैयक्तिक कागदपत्रांचा वापर करून विविध बँकांतून ही फसवणूक 17 नोव्हेंबर 2024 ते 13 जानेवारी 2026 दरम्यान तब्बल 81 लाखांहून अधिक रकमेचे कर्ज वारंवार काढून केली आहे. 25लाख रुपयांचे कर्ज करून देतो, असे सांगत प्रत्यक्षात विविध बँकांतून 81 लाख 19 हजार 316 रुपयांचे कर्ज काढून देत 48लाख 34 हजार 316 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला.
advertisement
या रकमेपैकी दिलप्रीत यांनी 25 लाख रुपये घरातील फर्निचरसाठी वापरले, तर आशुतोषने त्यांना 7 लाख 85 हजार रुपये परत दिले. मात्र उर्वरित कर्ज फेडण्याचे आश्वासन देत या रकमेचा अपहार केल्याचे म्हटले आहे.
नेमक काय घडलं?
खडपाडा परिसरात राहणाऱ्या दिलप्रीत कौर गरेवाल या इसमाला आर्थिक मदतीची गरज होती. याच संधीचा फायदा घेत तृप्ती आणि दुर्गाप्पा जाधव यांनी 25 लाखांचे कर्ज करून देण्याचे आमिष दाखविले, त्यासाठी दिलप्रीत यांचे महत्वाचे वैयक्तिक कागदपत्रे लागणार असल्याची माहिती या इसमाला देऊन तब्बल दोन वर्षात 81 लाखांहून अधिक रकमेचे कर्ज काढले. तर 45 लाख 34 हजार 316 रुपयांची फसवूक केली आहे. आशुतोषने त्यांना 7 लाख 85 हजार रुपये परत दिले. मात्र, उर्वरित कर्ज फेडण्याचे आश्वासन देत, या रकमेचा अपहार केल्याचे दिलप्रीत यांनी म्हटले आहे.
