रत्नागिरीत मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी गौरी गणपती, 4 सप्टेंबर रोजी 9 दिवसांचे गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि 7 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी देखील सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तीचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी रामनाका- राधाकृष्ण नाका – गोखले नाका- विठ्ठल मंदिर- काँग्रेस भवन या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
रत्नागिरीतील रामनाका-तेलीअळी नाका- आठवडा बाजार चौक-भुते नाका- मत्स्यालय-मांडवी समुद्र किनारा या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरू राहील. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिद्ध केली असून नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
advertisement
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
September 02, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
Ratnagiri: गणेश विसर्जनाला वाहतूक मार्गात मोठे बदल, रत्नागिरीतील हे मार्ग बंद, पाहा पर्यायी रस्ते