तिकीट बुक कसे कराल?
npublic.msrtcors.com या वेबसाईटवरून प्रवाशांना बस आरक्षित करता येणार आहे. त्याचबरोबर आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपमधून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी 30 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांमधून कोकणसाठी गाड्या पाठवण्यात येणार आहेत.
या नागरिकांना देण्यात येणार सवलत
महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी (65 वर्षांवरील) तिकीट दरात 50 आणि 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे. गौरी-गणपतीचे विसर्जन 2 सप्टेंबर रोजी असल्यामुळे त्या दिवसांपासून परतीच्या गाड्यांची नियोजन रत्नागिरी विभागातून करण्यात आले आहे.
advertisement
हे ही वाचा : Mumbai Taffic: मुंबईकर जरा दमानं, वाहतूक नियम मोडल्याने 25,618 वाहनांवर कारवाई
हे ही वाचा : दक्षिण मुंबईत आता म्हाडाची घरे... मुंबईकरांना संधी, 70 मजली इमारतीची लवकरच लॉटरी