TRENDING:

कोकणात पावसाचा जोर वाढला, सिंधुदुर्गला 'यलो अलर्ट'; जाणून घ्या कधी परतणार मान्सून?

Last Updated:

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक भागांमध्ये मुसळधार सरी बरसत आहेत. सकाळपासूनच पावसाळी वातावरण असले तरी, दुपारनंतर...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, अनेक भागांमध्ये मुसळधार सरी बरसत आहेत. सकाळपासूनच पावसाळी वातावरण असले तरी, दुपारनंतर पावसाने जोर धरला आणि सावंतवाडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांना अक्षरशः झोडपून काढले. या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने जिल्ह्यात गुरुवारपर्यंत 'यलो अलर्ट' जारी केला असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
Sindhudurg News
Sindhudurg News
advertisement

पिकांना जीवदान

एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी, दुसरीकडे हा पाऊस शेतीसाठी 'अमृत' ठरत आहे. सध्या भात पीक फुलोऱ्यात आले असून, दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी पावसाची नितांत गरज असल्याने, या सरींमुळे भात आणि नाचणी पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

advertisement

दरम्यान, हवामान विभागाने मान्सूनच्या माघारीसाठी स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट केले आहे. राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मान्सून 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान माघार घेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे ही वाचा : ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार 3 लाख 50 हजार रु, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

advertisement

हे ही वाचा : कांदा अनुदान दुप्पट होणार? राज्य सरकारच्या बैठकीतील 5 महत्वाचे निर्णय

मराठी बातम्या/कोकण/
कोकणात पावसाचा जोर वाढला, सिंधुदुर्गला 'यलो अलर्ट'; जाणून घ्या कधी परतणार मान्सून?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल