HSRP बसवण्याची प्रक्रिया सुरू
यापूर्वी सरकारने एचएसआरपी बसवण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, त्यावेळी जिल्ह्यात केवळ 3 ‘फिटमेंट सेंटर्स’ (नंबरप्लेट बसवण्याची केंद्रे) होती, ज्यामुळे सर्व वाहनांना नंबरप्लेट बसवणे शक्य नव्हते. यामुळे सरकारने ही मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवली आणि सेंटर्सची संख्या 27 पर्यंत वाढवली.
जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली, पण एचएसआरपी नसलेली एकूण 2 लाख 11 हजार 423 वाहने आहेत. यापैकी 7 जुलैपर्यंत 1 लाख 22 हजार 737 वाहनांनी (58 टक्के) नंबरप्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 96 हजार 285 वाहनांना (46 टक्के) ही नंबरप्लेट बसवण्यात आली आहे.
advertisement
कारवाई होणार की मुदत वाढणार?
परिवहन विभागाने सांगितले की, एचएसआरपीसाठी 15 ऑगस्टची अंतिम मुदत दिली आहे. यानंतरही ज्या वाहनांना ही नंबरप्लेट बसवलेली नसेल, त्यांच्यावर 'वायुवेग पथकामार्फत' कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आता 15 ऑगस्टनंतर खरोखरच कारवाई होणार की पुन्हा एकदा मुदत वाढणार, याकडे सर्व वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा : Angaraki Chaturthi: अंगारकीसाठी पुण्यात वाहतूक बदल, पर्यायी मार्ग कोणते? पाहा एका क्लिकवर
हे ही वाचा : HSRP Number Plate: उरले फक्त 3 दिवस! HSRP नंबर प्लेट अजूनही घेतली नाही, किती बसणार दंड?