HSRP Number Plate: उरले फक्त 3 दिवस! HSRP नंबर प्लेट अजूनही घेतली नाही, किती बसणार दंड?

Last Updated:

महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 5000 ते 10000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
तुम्ही अजूनही नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नाही का? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही टाळाटाळ करत असाल तर आताच सावध व्हा! ज्यांनी ही नंबरप्लेट बसवून घेतली नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तुमच्याकडे केवळ 3 दिवस शिल्लक आहेत. महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. तुमच्या वाहनासाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. सरकारने ही मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत दिली आहे.
ज्यांनी अजूनही ही नंबर प्लेट घेतली नाही त्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही तुमच्या जुन्या वाहनावर (एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या) अजूनही HSRP नंबर प्लेट बसवली नसेल, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. वाहन चोरी आणि फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने HSRP नंबर प्लेट बंधनकारक केली आहे. या प्लेट्सवर एक विशिष्ट लेझर-एच्ड कोड, क्रोमियम-आधारित होलोग्राम आणि स्नॅप-लॉक सिस्टम असते, ज्यामुळे त्या बनावट करणे किंवा बदलणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढते आणि चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे सोपे होते.
advertisement
गेल्या काही महिन्यांपासून परिवहन विभागाने HSRP प्लेट बसवण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला मार्च 2025 मध्ये असलेली मुदत अनेकदा वाढवून ती आता 15 ऑगस्ट 2025 करण्यात आली आहे. मात्र, यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तातडीने या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.
16 ऑगस्ट 2025 पासून, परिवहन विभागाचे भरारी पथक आणि पोलीस दल HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू करेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी 5000 पर्यंत आणि पुन्हा पुन्हा आढळल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे, मोठ्या दंडापासून वाचण्यासाठी आणि आपल्या वाहनाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, लवकरात लवकर HSRP नंबर प्लेट बसवून घ्या. ही प्लेट बसवण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करू शकता.
advertisement
सरकारने आतापर्यंत नव्या नंबरप्लेटसाठी तीनवेळा मुदतवाढ केली आहे. 30 एप्रिलपर्यंत शेवटची तारीख होती, ती वाढवून 30 जून करण्यात आली, त्यालाही मुदतवाढ देऊन 15 ऑगस्ट करण्यात आली आहे. यानंतर मुदतवाढ केली जाईल याचे कोणतेही संकेत सरकारने दिले नाहीत. त्यामुळे मुदतवाढ होईल या भरवशावर राहिला असाल तर फसगत होऊ शकते. आताच अर्ज करून नवीन नंबर प्लेट घेऊन टाका.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
HSRP Number Plate: उरले फक्त 3 दिवस! HSRP नंबर प्लेट अजूनही घेतली नाही, किती बसणार दंड?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement