कोलेस्टेरॉल वाढणं ही एक गंभीर समस्या आहे. कोलेस्टेरॉल हा रक्तात आढळणारा मेणचट किंवा चिकट पदार्थ असतो. लिव्हर कोलेस्टेरॉल तयार करतं किंवा तुम्ही जे पदार्थ खाता त्यापासून कोलेस्टेरॉल तयार होतं. आरोग्यासाठी कोलेस्टेरॉल गरजेचं आहे; पण जेव्हा त्याची पातळी वाढते तेव्हा गंभीर समस्या तयार होतात. शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी जास्त वाढली तर हृदयविकार, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका यांसारखे आजार होतात. वर्ल्ड हार्ट फेडरेशन अर्थात डब्ल्यूएचओएफच्या माहितीनुसार, हाय कोलेस्टेरॉलमुळे दर वर्षी 4.4 दशलक्ष जणांचा मृत्यू होतो. एकूण मृत्यूंपैकी हे प्रमाण 7.8 टक्के आहे.
advertisement
Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी हे उपाय नक्की करा, तब्येत राहील ठणठणीत
- शरीरातली कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मिठाचा समावेश कमी प्रमाणात करावा.
- आहारात फळं, भाज्या, कडधान्यांचा समावेश जास्त प्रमाणात असावा.
- डब्ल्यूएचएफच्या माहितीनुसार, कोलेस्टेरॉलची पातळी वाढू नये यासाठी धूम्रपान कमी प्रमाणात करावं. तसंच रोज किमान 30 मिनिटं व्यायाम करावा. तसंच मद्यपान टाळावं. तणावापासून दूर राहावं.
- आहारात मांस समाविष्ट असेल तर कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मांसाचं सेवन कमी करावं. कारण त्यातल्या फॅटमुळे कोलेस्टेरॉल वेगाने वाढतं. त्याऐवजी हेल्दी फॅटयुक्त पदार्थ खावेत. वजन नियंत्रणात ठेवावं.
- कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं अवघड आहे, असं तुम्हाला कदाचित वाटत असेल; पण त्याची सुरुवात फक्त कोलेस्टेरॉल पातळी तपासणीपासून करावी लागते.
डब्ल्यूएचएफने दिलेल्या माहितीनुसार, स्टेटिनसारखी काही औषधं कोलेस्टेरॉल कमी करण्यास किंवा त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यास मदत करतात; पण तुम्ही जीवनशैलीत सुधारणा करूनदेखील कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी कमी करू शकता.
Cholesterol Control Tips: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी टिप्स...5 भाज्या ठरू शकतात रामबाण उपाय...