झोपेची कमतरता तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर किती गंभीर परिणाम करते, हे अनेक अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे. पण चांगली बातमी ही आहे की, काही सोप्या सवयी लावून तुम्ही तुमच्या झोपेची गुणवत्ता कमालीची सुधारू शकता. चला, जाणून घेऊया शांत आणि गाढ झोपेसाठीच्या 5 खास टिप्स.
चहा-कॉफीला दिवसा 'हो', रात्री 'नाही' म्हणा!
advertisement
दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी चहा किंवा कॉफी पिणे सामान्य आहे, पण हेच कॅफिन रात्री तुमच्या झोपेचे शत्रू बनते. कॅफिनमुळे तुमचा मेंदू जागृत राहतो, ज्यामुळे तुम्हाला लवकर झोप लागत नाही. त्यामुळे, जर तुम्हाला शांत झोप हवी असेल, तर दुपारनंतर चहा-कॉफी पिणे टाळा.
शरीराच्या घड्याळाला शिस्त लावा!
आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ (Biological Clock) असते, जे झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेनुसार काम करते. रोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावल्यास हे घड्याळ व्यवस्थित सेट होते. यामुळे तुम्हाला वेळेवर झोप येते आणि सकाळी आपोआप जागही येते. रात्री किमान 7 ते 8 तासांची झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
मेलॅटोनिन : निसर्गाचा झोपेचा संदेशवाहक
मेलॅटोनिन हे आपल्या मेंदूत तयार होणारे एक नैसर्गिक संप्रेरक (Hormone) आहे, जे आपल्याला झोपेचा संकेत देते. अंधार झाल्यावर मेंदू हे संप्रेरक तयार करतो. जर तुम्हाला झोपेची समस्या जास्त असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही मेलॅटोनिन सप्लिमेंट्सचा विचार करू शकता.
दिवसभर घाम गाळा, रात्री शांत झोपा!
नियमित व्यायामामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. दिवसा केलेल्या व्यायामामुळे रात्री शांत झोप लागण्यास खूप मदत होते. व्यायामामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि थकलेल्या शरीराला नैसर्गिकरित्या आरामाची गरज भासते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
मनातली चिंता दूर करा, झोप आपोआप येईल!
तणाव (Stress) हा शांत झोपेचा सर्वात मोठा शत्रू आहे. मनात सतत विचार चालू असतील, तर झोप लागणे कठीण होते. त्यामुळे, झोपण्यापूर्वी मनाला शांत करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही योग, ध्यान (Meditation) किंवा श्वासाचे व्यायाम करू शकता. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला गाढ झोप लागेल.
हे ही वाचा : नवी ठिकाणं नाहीत, ॲडव्हेंचर्स नाही, प्रवास फक्त 'शांत झोपे'साठी! 'स्लीप टुरिझम' म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या फायदे
हे ही वाचा : Snoring : घोरण्याच्या समस्येवर हे उपाय करुन बघा, डॉक्टरांनी सांगितली खास युक्ती