नाशिक: सध्या मार्केटमध्ये कितीतरी रंगीबेरंगी कपडे आले आहेत. पण तरीही ‘ब्लॅक अँड व्हाईट’ कपड्यांची क्रेझ अजूनही कायम आहे. विशेष प्रसंगी, कार्यक्रमात अनेकजण पांढरा शर्ट अन् काळी पँट हेच काँबिनेशन आवडीनं परिधान करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सारख्या प्रसंगी तर आवर्जून पांढऱ्या रंगाचे कपडेच परिधान केले जातात. नाशिकमध्ये अशाच फक्त पांढऱ्या रेडिमेड कपड्यांचं एक दुकान असून तिथं अगदी 499 रुपयांपासून आकर्षक शर्ट मिळतात. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
नाशिकमध्ये आत्मा क्लॉथिंग नावाचं दुकान आहे. इथं वेगवेगळ्या व्हरायटीचे फक्त पांढरे कुर्ते आणि शर्ट मिळतात. इतर कुठल्याही रंगाचे कपडे इथं मिळत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आठवड्यात या दुकानात खास ऑफर जाहीर करण्यात आलीये. त्यामुळे या दुकानात कपडे खरेदीसाठी मोठी गर्दी होतेय.
काय आहेत दर?
आत्मा क्लॉथिंग या दुकानात जवळपास 100 हून अधिक प्रकारचे पांढरे कपडे आहेत. यामध्ये कुर्ती, व्हाईट शर्ट्समध्ये अनेक व्हरायटी आहेत. यात लिनन, कॉटन, कॉटन पेपर, सिल्क अशा प्रकारच्या पांढऱ्या कपड्यात विविध प्रिंट्स देखील आहेत. इथं फक्त 499 रुपयांपासून हे शर्ट्स आणि कुर्ती मिळतात. कापड आणि क्वालिटीनुसार दर कमी जास्त आहेत. परंतु, अगदी स्वस्तात कपडे घ्यायचे असतील तर हे ठिकाण उत्तम पर्याय असल्याचं दुकानदार सांगतात.
उन्हाळ्यात पांढऱ्या कपड्यांना पसंती
उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकजण पांढऱ्या कपड्यांना विशेष पसंती देतात. उष्णतेपासून बचावासाठी देखील पांढरे कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. तर अनेकजण आवडीने असे कपडे परिधान करतात. राजकारणी लोक तर आवर्जून या ठिकाणाहून खरेदी करतात. तुम्हाला देखील 100 हून अधिक प्रकारचे कपडे पाहून आवडती खरेदी करायची असेल, तर इथं भेट देऊ शकता.





