पुणे : बर्फाचा प्रदेश म्हणून लडाख ओळखला जातो. लडाख हे अनेक भारतीयांसाठी एक हॉट पिकनिक डेस्टिनेशन आहे. पण लडाखची अजून एक खासियत आहे. ती म्हणजे या ठिकाणची अँटिक ज्वेलरी, वेगवेगळ्या खड्यांनी बनवलेली ही अँटिक ज्वेलरी महिलांमध्ये अतिशय आकर्षणाचा मुद्दा आहे. ही अँटिक ज्वेलरी आता पुण्यातील बाजारपेठेत दाखल झालेली आहे.
advertisement
कुठे कराल खरेदी?
पुणे शहरातील बालगंधर्व परिसरात लडाखची ही खास ज्वेलरी मिळणार आहे. 80 रुपये किमतीपासून ते 3 हजार रुपये किमतीपर्यंतचे अनेक अँटिक दागिने या ठिकाणी आहेत. यामध्ये तुम्हाला स्टोन कानातले, स्टोनच्या अंगठ्या, रंगीबेरंगी आकर्षक झुमके, लडाखच्या मणी माळा, पैंजण, लडाख डायमंड ज्वेलरी सेट, ब्रेसलेट, अँगलेट, मोती बांगडी यांसह इतर सगळ्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत.
घरीच बनवले जातात आकर्षक दागिने, बंजारा महिलांची ज्वेलरी बनते कशी?
या सगळ्या अँटिक दागिन्यांमध्ये तुम्हाला रेड रूबी आणि स्पिनेल्स एक्वामरीन देखील मिळेल. यासर्वांबरोबच महिलांची कायमस्वरूपी आवड असणारा हिरा अर्थात क्लासिक डायमंड देखील तुम्हाला याठिकाणी मिळेल. पार्टीवेयर नेकलेस देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे सगळे दागिने लडाखचे पारंपारिक दागिने असून ते हाताने बनवलेले दागिने आहेत. क्रिस्टलचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात वापरतात, असं दागिन्यांचे विक्रेते आणि कारागीर बिलाल अहमद यांनी सांगितलं.
उन्हाळ्यात कम्फर्ट सोबतच डॅशिंग लुक हवाय? तो देखील 100 रुपयात? 'हे' पाहाच
अशी सुंदर आणि आकर्षक ज्वेलरी खरेदी करण्यासाठी आता पुणेकरांना लडाखला जाण्याची अजिबातच गरज नाहीये. तुम्ही या ठिकाणावरून ही अँटिक ज्वेलरी खरेदी करू शकता किंवा आपल्या प्रियजनांना भेट देखील देऊ शकता.