ऑईली त्वचेवर स्क्रब केल्यास काय होऊ शकतं?
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, हिवाळ्यात आपली त्वचा अतिशय सेन्सिटिव्ह होते. त्यामुळे कोणतेही इजा करणारे प्रॉडक्ट वापरू नये. ऑईली त्वचेवर आधीच भरपूर इंपेक्शन असतात. स्क्रब केल्यानंतर ते पूर्ण चेहऱ्यावर पसरतात. त्यानंतर बारीक पचवाले पिंपल्स चेहऱ्यावर येतात. पूर्ण चेहरा पिंपल्सने भरून जातो. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे हे पिंपल्स लवकर जात नाहीत. त्यामुळे ऑईली स्किनवर स्क्रब करणे टाळाच.
advertisement
ड्राय स्किनवर स्क्रब केल्यास काय होऊ शकतं?
हिवाळ्यात आपली त्वचा आधीच चिडचिडी होते. सर्वाधिक त्रास असतो तो म्हणजे ड्राय स्किन असणाऱ्यांना. ड्राय स्किन असणाऱ्यांनी जर स्क्रब केले तर त्वचेतील नॅचरल ऑईल म्हणजेच ओलावा पूर्णतः निघून जातो. त्वचा आणखी कोरडी होते. त्यानंतर जर डायरेक्ट उन्हात आपला संपर्क आला तर त्वचा काळी पडते. तसेच त्वचा खाजणे, लाल पडणे, बर्निंग इफेक्ट, छोटे पिंपल्स अशी समस्या वाढते. स्क्रबमुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्वचा रफ आणि फाटल्यासारखी वाटू लागते. त्यामुळे त्वचेला स्क्रब करू नये.
स्क्रब केले असेल तर काय करावं?
चुकीने जर स्क्रब केले असेल तर केल्यानंतर ताबडतोब मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचेचं नुकसान टाळता येऊ शकते, अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली.