पण थांबा! तुम्ही तुमचा लेहेंगा कसा निवडता? केवळ सुंदर डिझाईन आणि आकर्षक रंग पाहून? जर तुमचं उत्तर 'हो' असेल, तर कदाचित तुम्ही निवडलेला महागडा लेहेंगा तुमच्यावर तितकासा शोभून दिसणार नाही. कारण लेहेंगा सुंदर दिसण्यासोबतच तो तुमच्या शरीरयष्टीला মানणारा असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमचा बॉडी शेप कोणता आहे, यावर कोणता लेहेंगा तुमच्यावर सर्वोत्तम दिसेल हे अवलंबून असतं.
advertisement
आता, जर तुम्ही येत्या सणासुदीच्या किंवा लग्नसराईच्या दिवसांत लेहेंगा घालण्याचा विचार करत असाल, तर खरेदीला जाण्यापूर्वी या खास टिप्स नक्की लक्षात ठेवा.
१. जर तुमची उंची कमी असेल:
उंचीने लहान असलेल्या मुलींनी निराश व्हायचं काहीच कारण नाही. तुम्ही 'हाय-वेस्ट' म्हणजेच कमरेच्या थोड्या वरून सुरू होणारे लेहेंगा निवडा. यामुळे उंची जास्त दिसण्याचा आभास निर्माण होतो. सध्या 'मोनोक्रोम' म्हणजेच एकाच रंगाचे (टॉप-टू-बॉटम) लेहेंगा खूप ट्रेंडमध्ये आहेत, तो तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. प्रिंटेड लेहेंगा निवडायचा असेल, तर उभ्या पट्ट्या किंवा उभ्या डिझाईन्सना प्राधान्य द्या. यामुळे तुम्ही नैसर्गिकरित्या उंच दिसाल.
२. जर तुम्ही उंच आणि सडपातळ असाल:
तुमची उंची जास्त आणि फिगर सडपातळ असेल, तर तुम्ही नशीबवान आहात! 'लो-वेस्ट' लेहेंगा तुमच्यावर खूपच छान दिसेल. तुम्ही 'लेयर्ड' म्हणजेच अनेक थरांचा लेहेंगा घालून एक ट्रेंडी आणि सुंदर लुक मिळवू शकता. मोठ्या आणि ठळक प्रिंट्स (Bold Prints) खास तुमच्यासाठीच आहेत. जर तुम्हाला थोडा घेरदार आणि भरलेला लुक हवा असेल, तर 'सर्कल लेहेंगा' नक्की ट्राय करा.
३. हात आणि छातीचा भाग भरलेला असल्यास:
जर तुमचा छातीकडील भाग आणि हात थोडे भरलेले असतील, तर तुम्ही जास्त घेर असलेला लेहेंगा निवडायला हवा. लेहेंग्यावर अधिक डिझाईन आणि कलाकुसर असू द्या, जेणेकरून लोकांचं लक्ष विभागलं जाईल आणि तुमचा लुक संतुलित वाटेल. ब्लाऊज निवडताना कोपरापर्यंत, थ्री-फोर्थ किंवा पूर्ण बाह्यांची निवड करा. यामुळे तुमचे हात अधिक बारीक दिसण्यास मदत होते.
४. कंबर आणि मांड्यांचा भाग भरलेला असल्यास:
जर तुमच्या मांड्या आणि कमरेचा भाग (Lower Body) थोडा भरलेला असेल, तर तुमच्यासाठी 'ए-लाईन' लेहेंगा सर्वोत्तम पर्याय आहे. हा लेहेंगा कमरेपासून खाली हळूहळू पसरत जातो, ज्यामुळे खालचा भाग संतुलित दिसतो. अशावेळी, ब्लाऊजवर अधिक लक्ष केंद्रित करा. सुंदर नेकलाईन आणि आकर्षक डिझाईन असलेला ब्लाऊज निवडा. यामुळे लोकांचं लक्ष तुमच्या शरीराच्या वरील भागाकडे आकर्षित होईल आणि तुम्हाला एक परफेक्ट बॅलन्स्ड लुक मिळेल.
हे ही वाचा : पुरुषांच्या कोणत्या गुणांवर महिला खरंच भाळतात? पुरुषांचे 'हे' ५ खास गुण, ज्यावर महिला आकर्षित होतात!
हे ही वाचा : केस न धुताच तेलकटपणा होईल दूर! तेल शोषून घेणाऱ्या 'या' ६ ब्युटी हॅक वापरा आणि टेन्शन फ्री व्हा