Diwali Shopping: दिवाळीला फक्त 40 रुपयांपासून लायटिंग, मुंबईतलं होलसेल मार्केट, पाहा लोकेशन
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Diwali Shopping: दिवाळीसाठी अगदी स्वस्तात लाइटिंग खरेदी करायची असेल तर मुंबईत होलसेल मार्केट आहे. इथं फक्त 40 रुपयांपासून आकर्षक लाइटिंग मिळतात.
मुंबई: दिवाळी अगदी काही दिवसांवरच आहे आणि त्यामुळे मुंबईतील मार्केट्स दिवाळीच्या खरेदीसाठी भरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमधील लोहार चाळी लाइटिंगच्या व्यवसायासाठी ओळखली जाते. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीमियम क्वालिटीच्या लाईट्स मिळतात, तेही होलसेल आणि रिटेल दरात.
महत्त्वाचं म्हणजे, इथे चायना आणि इंडियन लाईट्स दोन्ही प्रकारच्या उपलब्ध आहेत. विविध डिझाईन्स, रंग आणि व्हरायटीसह लाईट्सची निवड करता येते. आणि सर्वात स्वस्त म्हणजे किंमत फक्त 40 रुपयांपासून सुरू होते.
होलसेल आणि रिटेल दर
लोहार चाळीत साध्या नॉर्मल लाईट्स फक्त 40–50 रुपयांपासून सुरू होतात. या दरांमध्ये 50, 70, 80 आणि 100 रुपयांच्या विविध रेंज उपलब्ध आहेत. या लाईट्स साधारण 10–15 मीटर लांबीच्या असतात आणि विविध रंगांमध्ये मिळतात.
advertisement
विविध प्रकारच्या लाइटिंगचे दर
मल्टी कलर लाईट: 10 मीटर 200 रुपये, 80 मीटर 350 रुपये
फुलांचा तोरण: 10 मीटर 200 रुपये, माळ 190 रुपये
स्टार लाईट 230 रुपये
रिबन लाईट 200 रुपये (20 मीटर)
तोरण (100 बल्ब) 350 रुपये
बार लाईट: लहान 150 रुपये, मोठा 230 रुपये
18 बार लाईट 250 रुपये
advertisement
पट्ट्यांची लाईट: लहान 550 रुपये, मोठा 1250 रुपये
स्पॉट लाईट 60 रुपये
रोप लाईट: 30 रुपये प्रति मीटर, रनिंग रोप लाईट 200 रुपये, स्टार रोप लाईट 150 रुपये
लोहार चाळीत तुम्ही होलसेल दरात लाइटिंग खरेदी करू शकता. होलसेलमध्ये खरेदी करताना किमान 10–15 पीस घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर, येथे तुम्ही रिटेल दरातही लाईटिंग खरेदी करू शकता. होलसेल आणि रिटेल दोन्ही दर वेगळे आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 15, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Diwali Shopping: दिवाळीला फक्त 40 रुपयांपासून लायटिंग, मुंबईतलं होलसेल मार्केट, पाहा लोकेशन








